You are currently viewing शनी जयंती: दिनांक १० जून २०२१

दिनांक १० जून २०२१ ला वैशाख अमावस्या असल्याने ह्या दिवशी शनी जयंती आहे. ह्या दिवशी शनी जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ज्या ज्या व्यक्तींना शनिदेवाची कृपा प्राप्त झाली आहे आणि ज्या व्यक्तींना शनी ची पीडा सुरु आहे अशा सर्व व्यक्ती ह्या दिवशी शनी ला प्रसन्न करण्यासाठी काही विशेष कार्य करतात ज्याने शनी ची कृपादृष्टी त्यांना प्राप्त होण्याची विशेष संधी ह्या दिवशी मिळते.

वरील सर्व गोष्टींचा विचार करून खाली दिलेले जे जे आपल्याला करता येईल ते ते करून शनी ची कृपादृष्टी आपल्यावर प्राप्त करून घेण्याचा नक्की प्रयत्न करा

  • सकाळी सूर्याला जल देणे.
  • पिंपळाला एका स्टील किंवा लोखंडी लोट्यात पाणी घेऊन त्यात काळे तीळ, अक्खे उडीद दाणे, थोडा गूळ, थोडे गायीचे कच्चे दूध एकत्र करून हे मिश्रण पिंपळाला अर्पण करावे आणि पिंपळाला ७ वेळा स्पर्श करून शनी मंत्र म्हणावा.
  • ह्या दिवशी शनी मंदिरात शक्य असल्यास जरूर जावे तेथे शनी च्या मूर्तीवर तेलाचा अभिषेक करावा (थोडे तेल घेऊन त्यात काळे तीळ घालून मूर्तीवर अर्पण करावे) , काळे अक्खे उडीद शनी च्या पायावर अर्पण करावे, एक काळे वस्त्र सुद्धा अर्पण करून प्रार्थना कारवी.
  • सायंकाळी सूर्यास्तानंतर पिंपळाला एक दिवा राईच्या तेलाचा जरूर लावावा त्या दिव्यात थोडे काळे तीळ घालून तो पिंपळाखाली ठेऊन प्रार्थना करावी. तेथे नैवेद्य म्हणून उडदाच्या डाळीची खिचडी एका पानावर ठेऊन पाणी सोडावे हे जर शक्य नसेल तर नुसता गूळ तरी नेवैद्याला ठेवावा. ह्याबरोबर शक्य असल्यास एक दिवा शिव मंदिरात सुद्धा लावावा आणि हा गायीच्या तुपाचा असावा.
  • शनी च्या मंत्राचा १/३/५ माळा जप पश्चिम दिशेला मुख करून रुद्राक्ष माळेवर जरूर करावा किंवा उपलब्ध नसेल तर असाच १० मिनिट जप करून घ्यावा. किंवा शनी चालीसा, हनुमान चालीसा पाठ केल्याने सुद्धा ह्याचे चांगले फळ मिळते.
  • ज्यांना पितृदोष आहे किंवा घरात अचानक अपघाती मृत्यू दिसले आहेत किंवा कोणत्याही पितरांचे श्राद्ध कर्म राहून गेले आहे आणि त्यामुळे पुढील पिढीसाठी उदरनिर्वाहाच्या समस्या निर्माण होत आहेत किंवा खूप घरात आजारपण आहेत तर शनी ची कृपादृष्टी ह्यातून आपल्याला नक्की सोडवू शकेल. ह्या प्रयोगात जेव्हा आपण शनी जयंती ला दिवा लावाल तेव्हा एक नारळ गोटा घ्या( जो नारळ सुखल्यावर अक्खा निघतो. मार्केट मध्ये मिळतो असा.) ह्या नारळावर वरील बाजूवर एक छेद करा त्यात खालील वस्तूंचे मिश्रण टाका. ( काजू बदाम मनुके सुखे खजूर साखर मिक्सर ला लावून पावडर बनवा). आता हा नारळ दिवा लावल्यानंतर तेथे असा मातीत पुरा ज्याने त्याचा वरील छेद हा थोडा वर राहील. हे केल्यानंतर पितरांच्या आशीर्वादाची प्रार्थना करा. ह्यात उद्देश असा असतो कि तेथे असलेल्या किडी त्याचा उपभोग बरेच दिवस करतील आणि आपल्या पितरांना गती मिळेल ह्याला किडी दान म्हणतात. शनी च्या सेवेत हा उत्तम प्रयोग आहे. नंतर पुढे ३ वर्षे प्रत्येक अमावसेला हा प्रयोग करत राहावा. ( एक विशेष — जर काही कारणास्तव नारळ मिळत नसेल तर सुखे खोबऱ्याची अर्धी कवड उपयोगात आणू शकता.)
  • सर्वात महत्वाचे आहे ते शनी जयंती ला शनीच्या वस्तूंचे दान गोरगरिबांना करणे. ह्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून शनी च्या वस्तू आणि त्याच्या दानांविषयी अधिक माहिती आपल्याला मिळेल. हि काही दाने आपल्याला सूर्यास्तानंतर करायची आहेत.

https://shreedattagurujyotish.com/shanichya-vastu-aani-tyachi-mahiti/

  • शनी ची कृपादृष्टी मिळविण्यासाठी ह्या दिवशी खास आजारी, गरीब, आणि वयस्कर व्यक्तीना केलेली कोणतीही मदत आपल्याला आपल्या समस्येपासून मोकळे केल्याशिवाय राहणार नाही.
  • खास ज्यांना साडेसाती आहे, (धनु मकर कुंभ) आणि ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शनी महादशा (१९ वर्षे) आहे. किंवा शनी आपल्या पत्रिकेत १ नंबर मेष राशीत (नीच) असेल अशा सर्व व्यक्तींना शनी जयंती ला वरील सेवा हि केल्याने काही त्रास कमी झालेले दिसतील.
  • ज्या व्यक्तींना सध्या कार्यक्षेत्री कोणताही त्रास असेल जसे जॉब नाहीत , जसे व्यवसायात प्रगती करता येत नाही, जसे खूप आजारपण आहेत, जसे पाठीची आणि पायांची दुखणी आहेत अशा सर्व व्यक्तीवर शनी ची कृपादृष्टी दिसत नसल्याने अशा सर्व व्यक्तींनी वरील शनी च्या कोणत्याही सेवा करून लाभ मिळवावा.
  • शनी ची कृपादृष्टी आपल्यावर रहावी असे जर आपल्याला वाटत असेल तर खालील काही गोष्टीची माहिती हि आपल्याला असणे आवश्यक असेल

१) कधीही वृद्धांचा अपमान करू नये
२) कधीही आपल्या हाथाखाली असणाऱ्या व्यक्ती ना त्रास देऊ नये (चतुर्थ श्रेणीत असणारे)
३) घरात शनी ची मूर्ती पुजू नये
४) शनी ची कोणतीही उपासना करताना असा नियम आहे कि शनी ची शिळा पूजन अति उत्तम पण सध्या शनी मंदिरात मूर्ती पूजा काही ठिकाणी होत असल्याने त्या मूर्तीच्या अगदी समोर उभे राहू नये.
५) शनी चा वार हा शनिवार आहे आणि ह्या दिवशी खास सात्विक राहणे अति आवश्यक असते.
६) कोणत्याही शनी च्या वस्तू ह्या शनिवारी घरात आणू नये.
७) शनीची पीडा आहे असे कळल्यास अशा व्यक्तींनी आपल्या जीवनातील सुख वस्तू जास्त घेऊ नये किंवा डम्प करून ठेऊ नये जेवढ्या गरजेच्या असतील तेव्हढ्याच घ्याव्यात. डम्प करून ठेवलेल्या वस्तू शनिवारी दान कराव्यात. खास त्यात आपल्या चपला बूट कपडे हे आधी काढून टाकावेत जे तुम्ही वापरात आणत नसाल. (गरिबांना दान करावेत).
८) पिंपळाच्या झाडाला कधीही इजा पोहचू नये. उलट एक तरी झाड शक्य असल्यास वर्षातून लावावे. पण ते घराजवळ नको. आणि एक झाड स्मशानात लावले आणि त्याची देखभाल केली मध्ये मध्ये त्यावर लक्ष ठेवले आणि संगोपन केले तर ह्या सारखा दुसरा उपाय नाही.

धन्यवाद…..!

Leave a Reply