You are currently viewing शनी आणि तुमचा विवाह प्रश्न: १००% परिणाम

शनी आणि तुमचा विवाह प्रश्न: १००% परिणाम

वरील पत्रिकेत जिथे जिथे शनी लिहिला आहे आपल्या लग्न कुंडलीत कोणत्याही एका स्थानी जर अशाच एका ठिकाणी शनी लिहिला असेल तर आपणास विवाह करताना किंवा वैवाहिक सुखात असताना काही विशेष बाबी वाचून घ्या आपल्या त्या फायद्याच्या जरूर ठरतील.

इथे कोणत्याही स्थानी शनी असला तर तो एकतर त्या व्यक्तीचा विवाह हा उशिरा होतो किंवा लवकर झाला असेल तर निदान वयाच्या साधारण ३०/३३/३६ पर्यंत विवाह सुख मिळताना कठीण होते.

पहिल्या स्थानातील शनी आणि विवाह सुख

जर आपल्या पत्रिकेत शनी हा पहिल्या स्थानी असेल तर त्याची ७ वि दृष्टी हि विवाह स्थानावर येते त्यामुळे विवाह उशीर होतो. किंवा आपल्याला विवाह करायचाच नसतो जेव्हा तुम्ही विवाहाच्या वयात असता आणि नंतर एकदम जागे होता. त्यास काही करणे असू शकतात कि आपण आपल्या सर्कल मध्ये हैराण असता.

काही जणांना इथे आरोग्याचे सुद्धा प्रश्न पडतात. येथील शनी आपल्याला आपल्या इंडिविज्युअल सुखात थोडा ताण निर्माण केल्यामुळे आपण त्रस्त होऊन वैवाहिक सुखात व्यत्यय येण्याचे चान्स होतात.

येथील शनी ची दृष्टी हि तिसऱ्या स्थानावर म्हणजे पराक्रम स्थानावर येते आणि १० वी दृष्टी हि कर्म स्थानावर म्हणजे दहाव्या स्थावर येते त्यामुळे अशा वेळी आपल्याला इथे एकच सल्ला दिला जातो कि आपण आपल्याला जो पर्यंत समाजाच्या समोर प्रेसेंट करत नाहीत जोपर्यंत आपला पराक्रम आणि करिअर स्टेबल होत नाही तोपर्यंत विवाह चा विचार दूर ठेवा. आणि जर आपल्या समाजात असलेल्या रूढी परंपरा ह्यांना सांभाळण्यासाठी करिअर च्या आधी जर लग्न केले तर वयाच्या ३०/३३ पर्यंत फार त्रास होऊ शकतील.

पाचव्या स्थानातील शनी आणि विवाह सुख

जर आपल्या पत्रिकेत शनी ग्रह हा पाचव्या स्थानी लिहिला असेल तर त्याची दृष्टी हि आपल्या वैवाहिक सुखात येते. अशा वेळी पाचवे स्थान हे संतान ज्ञान आणि प्रेम ह्याचे असल्यामुळे वैवाहिक सुखात ह्याचा व्यत्यय असण्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यासाठी असा सल्ला दिला जातो कि आपण आपले शिक्षण आणि ज्ञानाचा पुरेपूर उपयोग केल्यानंतरच विवाह करावा.

इथे जर आपला विवाह २८ किंवा ३० च्या आधी झाला असेल तर आपल्याला वैवाहिक सुखात दोन गोष्टींचा सामना जरूर करावा लागतो एक कि संतान उत्पत्ती करण्यास त्रास होतो आणि दुसरे प्रेम आपुलकी मिळेल का ह्याचा सुद्धा प्रश्न उद्भवतो. खास हा विषय मुलींच्या पत्रिकेत मुलांपेक्षा जास्त येतो. मुलांच्या बाबतील इथे करिअर साठी फार त्रास होतो.

येथील शनी ची ७ वी दृष्टी हि इच्छापूर्तीच्या स्थानावर येते त्यामुळे विवाह लवकर झाल्यावर इच्छा पूर्ती लगेच होताना कठीण होते. कुटुंब स्थानावर येथून शनी ची १० वी दृष्टी येत असल्यामुळे कुटुंबात काही प्रॉब्लेम होण्याची शक्यता सुद्धा फार असते

सातव्या स्थानातील शनी आणि विवाह सुख

जर आपल्या पत्रिकेत सातव्या स्थानी शनी लिहिला असेल तरी विवाह उशिरा होण्याची हि लक्षणे दिसतात. ह्या शनी ची ७ वी दृष्टी हि प्रथम स्थानावर येते त्यामुळे त्यात एक कारण असे असते कि विवाह ह्या विषयी थोडी भीती दडपण येते.

शनी इथे आपल्याला न्यूनगंडात ठेऊ शकतो. किंवा बऱ्याच जणांना शारीरिक त्रास सुद्धा होताना पाहिले असल्यामुळे इथे विवाहात उशीर होतो. आणि असे विवाहाच्या आधी झाले नसेल आणि आपला विवाह जर २८/३० च्या आधी झाला असेल तर आपणास शारीरिक सुखासाठी एखादा त्रास जाणवतो. फिझिकल अटॅचमेंट मध्ये त्रास होऊ शकतो आपणास किंवा आपल्या पार्टनर ला त्यात त्रास होऊ शकतो. बऱ्याच वेळा पत्रिकेत जोडीदाराला आरोग्याच्या तक्रारी दिसतात.

शनीची ७ वी दृष्टी आरोग्यासाठी, शनी ची ३री दृष्टी भाग्योदयासाठी आणि शनीची सुख स्थानावर १० वी दृष्टी विवाहानंतर च्या विषयात जास्त त्रस्त होऊ शकतील.

दहाव्या स्थानातील शनी आणि विवाह सुख

जर आपल्या पत्रिकेत दहाव्या स्थानी शनी लिहिला असेल तर आपल्या समोरील करिअरच्या वाटा किंवा करिअर बद्दल एखादे टार्गेट मुळे आपला विवाह हा उशिरा होण्याचा संभव असतो आणि असे होत असेल तर उत्तम कारण ह्यात मुळात करिअर झाल्याशिवाय विवाहच करू नये कारण इथे शनी ची १० वी दृष्टी हि विवाह स्थावर सातव्या स्थानावर येते.

जर कुणाचा विवाह इथे शनी असताना २८/३० च्या आधी झाला असेल तर त्यांना ३०/३५ पर्यंत कर्म स्थानात त्रास होतो.विवाह झाल्यानंतर करिअर सेट होताना कठीण असते.

शनीची तिसरी दृष्टी बाराव्या स्थानावर येते त्याने गुंतवणूक ह्यावर परिणाम दिसतो, शनीची ७ वी दृष्टी हि चौथ्या स्थानावर दिसते इथून घरातील वातावरण थोडे त्रासदायक होऊ शकते.

नोट: वरील शनी ची स्थिती पाहून विवाह करताना सर्वाना असा सल्ला देण्यात येतो कि आपल्या समाजात इतरांचे जे एव्हरेज वय आहे विवाह करण्यासाठी त्या वयाच्या २/४ वर्षे आपल्याला नंतर विवाह केला पाहिजे म्हणजे शनी चे जे जे विषय मी इथे दिले आहेत ते तुम्ही विवाह आधीच क्लिअर करू शकता. ( अर्थात संतान विषय सोडून).

उदाहरण जर आपल्या समाजात सर्वांचे विवाह जर २४ च्या आधी होत असतील तर आपल्याला २६ वर्षापर्यंत थांबायचे आहे मी इथे २८/३० हे वय सर्व खुल्या समाजासाठी मांडला आहे.

विवाहात शनी ची हि भीती का?

वरील हे सर्व लिहिण्यामागील एक सूत्र सांगतो कि शनी ची ३ री दृष्टी किंवा ७ वी दृष्टी किंवा १० वी दृष्टी आपल्या विवाह स्थानावर येत असल्यामुळे ( जे जे लाल बाण आहेत शनी वरून निघालेले ते सर्व विवाह स्थानावर दाखविले आहेत) हि विच्छेदात्मक दृष्टी मानतात आणि हा विषय १००% आपल्याला त्रास दिल्याशिवाय राहत नाही.

का शनी इथे त्रास देतो कारण तुम्ही विवाहाच्या सुखाची घाई करता. आधी चेक करा विवाह करण्याआधी आपल्याला शनी ने कोणत्या कोणत्या स्थानाची काळजी घ्यायची आहे हे बाणाने सांगितले आहे.

त्यामुळे जिथे जिथे शनी पाहत असेल तिथले तिथले तुमच्या आयुष्यातील कार्य पूर्ण केल्याशिवाय लग्नाचे सुख मिळविण्यास जाऊ नये असे माझे मत आहे.

त्यामुळे जर अधिक ह्यवाबद्दल जाणून घ्यायचे असेल तर विवाह करताना ह्या शनीचा अभ्यास योग्य ज्योतिषांकडून करून घ्या. कारण इथे मी आपला शनी कोणत्या राशीत किती डिग्रीवर आणि त्याच्यावर कोणाची दृष्टी कशी आहे हे न पाहता लिहीत आहे. त्यात थोडा कमी जास्त परिणाम दिसेल पण हा काळजीचा विषय नक्की आहे.

धन्यवाद…..!

Leave a Reply