नुमरॉलॉजि ची प्रॅक्टिस करता करता अशा एका योगाचा (नियमाचा) उलगडा झाला आहे ज्याने मला वाटते प्रत्येकाने आपल्या जन्मतारखेत तो योग कसा आहे तो चेक करून पहावा.
हा माझा स्वतःचा अभ्यास आहे ह्यात आपणास खाली दिलेले विवेचन ९०% पटेल १०% जर तो योग लागू होत नसेल तर त्याची कारणे सुद्धा इथेच दिली आहेत. आणि १०% लोकांना ज्यांना हा योग मिळाला नाही त्यांनी जे जे केले ते मी इथे देणार आहे आणि तोच उपाय समजावा तुमच्या रिटायरमेंट चा आनंद घेण्यासाठी.
एका पेपर वर तुमची पूर्ण जन्मतारीख अंकात लिहा
२८/११/१९७०
- ह्यात मूलांक 2+8 = 1 आहे
- ह्यात भाग्यांक 2+8+1+1+1+9+7+0 = ह्याची सर्वांची बेरीज हि 29 येत आहे 2+9 = 11 , पुन्हा 1+1 =2 हा एक अंकी भाग्यांक झाला आहे.
ह्या जन्म तारखेत कुठेही 3 आणि 4 हे अंक दिसत नाहीत. आणि मूलांक आणि भाग्यांक मधे सुद्धा ३ आणि 4 चा संबंध नाही.
नियम —
- कोणाच्याही जन्म तारखेत जर 3 आणि 4 ह्या दोन्ही नंबर चा संबंध वरील प्रमाणे येत नसेल तर अशा ९०% लोकांना त्याचा रिटायरमेंट चा आनंद मिळताना त्रास पहिला आहे.
- तो आनंद म्हणजे व्यक्ती एकाच फिल्ड मधून रिटायर झाला पाहिजे.
- रिटार्यमेंट होताना त्याला आपल्या कोणत्याही कार्यक्षेत्राचा त्रास झाला नाही पाहिजे
- त्याच्या मानसन्मानात कोणताही कमीपणा होऊन तो रिटायर झाला नाही पाहिजे
- रिटायर होत असताना त्याचे आरोग्य त्याला साथ देत देत तो रिटायर झाला पाहिजे
- रिटायरमेन्ट होत असताना त्याच्या सर्व सर्व्हिस चा मोबदला मिळताना त्याचे कोणतेही नुकसान न होता तो रिटायर झाला पाहिजे
- रिटायरमेन्ट होत असताना त्याच्या सर्कल चा म्हणजे त्याच्या घरातील वातावरण त्यास सपोर्टिव्ह असले पाहिजे
- रिटायरमेन्ट होत असताना त्याची फर्म बंद पडून किंवा कोणत्याही कारणासाठी त्याला रिटायरमेन्ट च्या आधी राजीनामा देण्याची पाळी येता कामा नये.
- आणि सर्वात शेवटी अति महत्वाचे म्हणजे असा व्यक्ती रिटायरमेंट च्या त्या वयापर्यंत राहिला पाहिजे म्हणजे त्याचे आयुष्य तरी 58/60 च्या वर पाहिजे
वरील सर्व बाबी ज्याच्याकडे रिटार्यमेंट होताना असलीच पाहिजेत तरच त्याला सर्व बाजूने त्या योगाचा आनंद घेता येतो असे माझे मत आहे.
ह्यात एक जरी कारण कुणाला मिळत असेल तर नक्कीच त्याच्या जन्मतारखेचा किंवा मूलांक भाग्यांकाचा संबंध ३ आणि ४ शी नसतो.
काही जण मला असे सुद्धा दिसले कि रिटायर होत असताना त्याच्यावर काही तरी केसेस आल्या.
काही जणांना रिटार्यमेंट चा हिशोबच मिळाला नाही.
काही जणांना पूर्ण सर्व्हिस मधे जेव्हढा त्रास झाला नाही तेव्हढा कोणत्याही कारणाने तो रिटायरमेंट च्या वेळी त्यांनी सहन केला आहे.
काही जण रिटायर होत असताना त्याचा आनंद घेण्यासाठी ते एकटे दिसले.
ह्यात प्रायव्हेट आणि सरकारी नोकरीत नियम सारखाच आहे.
आता १०% लोकांना वरील नियम अपवाद राहिला म्हणजे तो लागूच झाला नाही जरी त्यांच्या जन्मतारखेचा ३ आणि ४ हे दोन्ही नाहीत.
त्याच्या बाबतीत असे झाले कि तो व्यक्ती आधीपासूनच बऱ्याच फिल्ड आपल्या आयुष्यात चेंज करत करत रिटायर झालेला असतो.
किंवा तो व्यक्ती एकाच फर्म बरोबर काम करत नसतो
किंवा त्याचे शिक्षण आणि त्याचे करिअर एकदम वेगळे होते म्हणजे त्याचे सर्टिफिकेट कोणत्याही जागी कामाला आले नाही
किंवा तो व्यक्ती नोकरी बरोबर व्यवसाय किंवा एक्सट्रा इनकम सुद्धा करत असतो.
किंवा तो व्यक्ती रीटायमेन्ट होता होता दुसरीकडे कुठेतरी लगेच काम करतो वयाचा ओव्हरटाईम करत असतो.
मात्र त्यात सुद्धा अट अशी आहे कि त्याने तेच काम करू नये जे तो आपल्या पूर्ण सर्व्हिस मधे करत होता.
आणि ज्यांच्याकडे हे दोन्ही अंक नसतील त्यांच्यासाठी हाच उपाय मी सांगत असतो. जेव्हा असा व्यक्ती माझ्याकडे वयाच्या 30/35 च्या दरम्यात येतो.
ह्या सर्व गोष्टीचा मी स्वतः जेव्हा अभ्यास केला तेव्हा १००% मला कळले कि रिटरमेंटचा आनंद जर मिळवायचा असेल तर 3 आणि 4 हे आपल्या जन्मतारखेत असलेच पाहिजेत.
आपण स्वतः हे आपल्या भोवतालच्या व्यक्तींकडे चेक करू शकता. आणि जो काही आपणास अनुभव येत असेल तो खाली कमेंट करू शकता.
हा नियम कोणत्याही अंकशास्त्राच्या पुस्तकात मिळणार नाही एव्हढे नक्की.
अशा विविध नव नवीन विषय आपल्या जन्मतारखेत जाणून घेण्यासाठी आपण नुमरॉलॉजि ची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि अधिक माहिती साठी shreedattagurujyotish.com ला व्हिजिट करू शकता.
धन्यवाद….!
श्री दत्तगुरु ज्योतिष
श्री अंकवेद
9821817768
7506737519