महाभाग्य योग पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगवेगळ्या नियमांत मोडतो.
- ज्या पुरुषाचा जन्म सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत झाला असेल आणि त्याचे लग्न (प्रथम स्थान) विषम राशीचे असेल आणि चंद्र सूर्य सुद्धा विषम राशीत असतील तर त्या पुरुषाच्या पत्रिकेत महाभाग्य योगाची फळे उत्तम मिळतात.
- ज्या स्त्री चा जन्म सूर्यास्तापासून ते सूर्योदयापर्यंत झाला असेल आणि तिचे लग्न हे सम राशीचे असेल आणि चन्द्र सूर्य सुद्धा सम राशीत असतील तर त्या स्त्रीच्या पत्रिकेत महाभाग्य योगाची फळे उत्तम मिळतात.
उदाहरण : जर पुरुषाचा जन्म दिवसा झाला आणि त्याचे प्रथम स्थानी १/३/५/७/९/११ असे विषम आकडे असतील म्हणजे तिथे ह्या क्रमांकाच्या राशी असतील आणि चंद्र सूर्य सुद्धा ह्याच विषम राशीत असतील.
आणि स्त्रीचा जन्म रात्री झाला आणि तिचे लग्न २/४/६/८/१०/१२ असे सम आकडे असतील म्हणजे तिथे ह्या क्रमांकाच्या राशी असतील आणि चंद्र सूर्य सुद्धा ह्याच सम राशीत असतील तर हा महाभाग्य योग होतो.
महाभाग्य योगाची फळे
ह्या योगात राजयोगाची सर्व फलिते मिळतात, व्यक्ती उदार, लोकप्रिय, प्रसिध्दिवान असतो. जर ह्याने राजकीय कार्यात भाग घेतला तर प्रगती होते.
स्त्रियांसाठी हा योग शालीन स्वभाव, सुशील, सभ्यता, सुख सौभाग्य प्राप्ती, प्रसिद्धी देणारा योग होतो.
नोट– चंद्र सूर्य ह्यावर पापग्रहांची दृष्टी असता किंवा चंद्र सूर्य पापकर्तरी योगात असता किंवा चंद्र सूर्य हे पापग्रहांच्या युतीत असताना ह्या युतीची फळे मजबूत मिळत नाहीत.
धन्यवाद…..!