होलाष्टक :-अशी मान्यता आहे कि हिण्यकश्यप चा मुलगा प्रल्हाद जो नारायण (विष्णू) भक्त होता त्याने हिण्यकश्यपला त्याचा फार राग येत होता कारण हिण्यकश्यप विष्णूचे अस्तित्व मानतच नव्हता. होळी च्या ८ दिवस अगोदर हिण्यकश्यप ने आपल्या मुलाच्या मागे लागून त्याला ह्या भक्ती मार्गातून दूर करण्यासाठी तगादा लावला आणि त्याचा खूप छळ केला. तेच हे ८ दिवस असल्याने तेव्हापासून शुभ कार्यासाठी हे वर्जित मानले जातात. नंतर ८ दिवसानंतर शेवटी काहीहि हिण्यकश्यपला शक्य झालें नसल्याने त्याने आपल्या होलिका बहिणीला जीला अग्नी देवाने न जळण्याचा आशीवार्द दिला होता तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसवून चारी बाजूने अग्नी पेटवून दिला. पण त्याने स्वतः ती त्यात भस्म झाली. आणि प्रल्हादाच्या नारायण भक्ती ची सर्वाना प्रचिती आली.
Table of Contents
काय करावे आणि काय करू नये
होलाष्टक चे ८ दिवस शास्त्राप्रमाणे त्यात विवाह, मुंज, गृह प्रवेश, वाहन घेणे, निर्माण कार्य, संस्कार, अशी शुभ कार्ये वर्जित आहेत. जन्म मृत्यू ची कार्ये हि ह्यात वर्जित मानलेली नाहीत.
ह्या दिवसतात व्रत जप दान ह्यांना विशेष महत्व आहे असे केल्याने भगवान नारायण प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात असा समज आहे. नारायण जप , नृसिंह अवतार यांचे वाचन, आणि हनुमानजी च्या विशेष साधना याना फार महत्व आहे. असे केल्याने व्यक्तीच्या आयुष्यातील कष्ट खुद्द नारायण दूर करतात असा समज आहे. ह्याची प्रचिती ८ दिवसात मिळते अशीही मान्यता आहे. जसे प्रल्हादाच्या मदतीसाठी नारायण धावून आले तशी.
होलाष्टक चा अवधी
२२ मार्च ला होलाष्टक सुरु होईल आणि तो २८ मार्च पर्यंत राहील.
होळी चे शुभ मुहूर्त – HOLI SHUBH MUHURT 2021
- होलिका दहनचा दिवस : 28 मार्च 2021
- होलिका दहनचा शुभ मुहूर्त : संध्याकाळी 6:37 वाजल्यापासून ते रात्री 8:56 वाजेपर्यंत
- पौर्णिमेची तारीख सुरू होते – 28 मार्च 2021 सकाळी 03.27 पासून
- पौर्णिमेची तारीख संपेल – 29 मार्च 2021 दुपारी 12.17 पर्यंत.
- एकूण कालावधी- 2 तास 20 मिनिटे.
- धुळवड – 29 मार्च 2021 (सोमवार)
धन्यवाद…..!