Table of Contents
चंद्राधि / लग्नाधि योग, आधि योग एक महान राजयोग
आधि ह्याचा अर्थ व्यापक करून शुभ फळ देणारा वाढविणारा असा होतो.
आपली लग्न कुंडली पहा जर हा योग असेल तर राजा बनविणारा, मंत्रिपद भूषविणारा, खूप पैसा देणारा, भरपूर सुख समृद्धी देणारा हा योग असतो. समाजातील थोर, प्रसिद्धीला असणाऱ्या, श्रीमंती भोगणाऱ्या व्यक्तींच्या पत्रिकेत असा योग पाहण्यात येतो.
एखादे कला वादन, वेगवेगळे छंद जोपासून, व्यापार करून, सिनेमांत कामे करून किंवा कोणत्याही क्षेत्रात प्रगती करून सुखी समाधानी व्यक्तीच्या पत्रिकेत हा योग पाहण्यात येतो.
चंद्राधि योग
जिथे चंद्र लिहिला असेल त्या स्थानापासून जर ६ व्या ७व्या आणि ८ व्या स्थानी बुध शुक्र गुरु एक एक ग्रह कोणतेही ह्या तिघांपैकी लिहिले असतील तर हा योग चंद्राधि योग होतो जो खूप सुदंर आहे. जीवनात खूप आनंदी ठेवणारा हा योग होतो. मानसिक स्थिरता, संतुलन राहते, अशा व्यक्ती जीवनात सर्व बाजूने समाधानी असू शकतात. जीवन सुरळीत जाते.
लग्नाधि योग
प्रथम स्थानापासून जर मोजले असता पत्रिकेत ६ व्या ७ व्या ८ व्या स्थानी एक एक शुभ ग्रह बुध शुक्र गुरु कोणत्याही क्रमाने लिहिला असेल तर हा योग लग्नाधि योग होतो. अशा व्यक्तीला आपल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये सफलता मिळते. व्यक्ती संपूर्ण त्याच्या जीवनात स्वतःच्या कर्तृत्वाने सफल होतो.
सूर्याधि योग
सूर्य पत्रिकेत कोठेही असेल पण तिथून मोजले असता ६ व्या ७ व्या ८ व्या स्थानी एक एक शुभ ग्रह बुध शुक्र गुरु कोणत्याही क्रमाने लिहिला असेल तर हा योग सूर्याधि योग होतो. अशा व्यक्तीकडे खूप आत्मविश्वास असतो त्या जोरावर व्यक्ती सर्व प्रकारचे यश मिळवितो आणि राजा सारखा होतो.
इतर आधि योग
हा योग चंद्र पासून किंवा लग्न (प्रथम स्थान) पासून सूर्य पासून पाहिला पण प्रत्येक स्थानापासून सुद्धा हा योग होतो त्या स्थानापासून जर ६ व्या ७ व्या ८ व्या स्थानी शुभ ग्रह लिहिले असतील तर व्यक्तीला त्या स्थानापासून जे जे लाभते ते अति शुभ लाभते. त्याचे विवेचन खाली पाहू.
- धन स्थान पहा म्हणजे द्वितीय स्थान– ह्या स्थानापासून ६/७/८ व्या स्थानी बुध शुक्र गुरु बसले असतील तर जीवनात खूप पैसा कमवीता येतो. मृत्यू पर्यंत धन टिकून राहते.
- प्रराक्रम स्थान पहा म्हणजे तृतीय स्थान — ह्या स्थानापासून ६/७/८ व्या स्थानी बुध शुक्र गुरु बसले असतील तर जीवनात असा व्यक्ती पराक्रमी दिसतो, भावा बहिणीचे सुख त्यास खूप लाभते.
- सुख स्थान पहा म्हणजे चतुर्थ स्थान — ह्या स्थानापासून ६/७/८ व्या स्थानी बुध शुक्र गुरु बसले असतील तर जीवनात फार सुखी असतो असा व्यक्ती. वाहन सुख, मातृ सुख, पर्सनल सुख ने समृद्ध असतो.
- संतान स्थान पहा म्हणजे पंचम स्थान — ह्या स्थानापासून ६/७/८ व्या स्थानी बुध शुक्र गुरु बसले असतील तर जीवनात संतान सुख चांगले प्राप्त होते. आपल्या ज्ञानाच्या जोरावर व्यक्ती प्रगतशील असतो. मैदानी खेळाडू असेल तर त्यात प्रसिद्धी होते.
- रोग स्थान पहा म्हणजे षष्ठ स्थान — ह्या स्थानापासून ६/७/८ व्या स्थानी बुध शुक्र गुरु बसले असतील तर जीवनात रोग, चिंता ह्याचे भय नसते. शत्रू नसतात किंवा असले तरी त्यावर तो मात करतो आणि आपले जीवन सुखी करतो.
- विवाह स्थान पहा म्हणजे सप्तम स्थान — ह्या स्थानापासून ६/७/८ व्या स्थानी बुध शुक्र गुरु बसले असतील तर जीवनात विवाह सुख उत्तम मिळते, लाईफ पार्टनर किंवा बिझिनेस पार्टनर उत्तम मिळतो. व्यापारी लाभ होतात. आणि जीवन सुखी होते.
- मृत्यु – पीड़ा स्थान पहा म्हणजे अष्ठम स्थान — ह्या स्थानापासून ६/७/८ व्या स्थानी बुध शुक्र गुरु बसले असतील तर जीवनात मृत्यूचे भय नसते मृत्यु सुस्थितित होतो जास्त त्रास होत नाही. अशा व्यक्तीची आयुमर्यादा सुद्धा चांगली असते.
- भाग्य स्थान पहा म्हणजे नवम स्थान — ह्या स्थानापासून ६/७/८ व्या स्थानी बुध शुक्र गुरु बसले असतील तर जीवनात भाग्योदय सुंदर असतो. भाग्य नेहमी साथ देते. ह्यात व्यक्ती धार्मिक सुद्धा असतो. चांगल्या गुरु चे मार्गदर्शन होते.
- कर्म स्थान पहा म्हणजे दशम स्थान — ह्या स्थानापासून ६/७/८ व्या स्थानी बुध शुक्र गुरु बसले असतील तर जीवनात करिअर उत्तम होते. पित्याचे सुख मिळते. आपल्या कर्माने व्यक्ती ओळखला जातो. त्याला मान सन्मान मिळतो. अधिकार प्राप्त करतो.
- लाभ स्थान पहा म्हणजे एकादश स्थान — ह्या स्थानापासून ६/७/८ व्या स्थानी बुध शुक्र गुरु बसले असतील तर जीवनात प्रत्येक प्रकारचे लाभ होतात आणि व्यक्ती सुखी होतो. मोठ्या बंधू भगिनींचा सपोर्ट चांगला मिळतो आणि मित्र मैत्रिणी सुद्धा चांगल्या मिळतात.
- व्यय स्थान पहा म्हणजे द्वादश स्थान — ह्या स्थानापासून ६/७/८ व्या स्थानी बुध शुक्र गुरु बसले असतील तर जीवनात स्वतःचे खर्च योग्य ठिकाणी करून जीवन सुखी करतो. परदेश गमन करून भाग्योदय करून घेतो. अध्यात्मात प्रगती करतो.
हा योग पूर्ण सफल केव्हा होणार नाही
- चंद्र पासून किंवा लग्न स्थानापासून किंवा सूर्या पासून किंवा कोणत्याही स्थानापासून ६/८/१२ व्या स्थानी शुभ ग्रह लिहिले असतील आणि हा योग बनतो आहे असे जरी दिसत असले तरी त्या कोणत्याही ग्रहावर शनी राहू केतू मंगळ ह्यांची दृष्टी किंवा युती नसावी. जर असेल तर ह्या योगाची शुभ फळे मिळण्यास उशीर लागेल किंवा मिळताना कठीण होईल.
- जे शुभ ग्रह आहेत ते चांगल्या सुस्थितीत असावेत त्यांच्या अवस्था सुद्धा उत्तम असाव्यात. ते मृत अस्त वृद्ध किंवा बाल्यावस्थेत नसावेत.
- कोणत्याही स्थितीत लग्न हे स्ट्रॉंग असावेच लागते त्याचा सुद्धा विचार करून ह्या योगाची फळे काढावी लागतील.
सल्ला — आपण पत्रिकेत आधि योग जर पाहत असाल तर लग्न कुंडलीत अशी तीन कोणतीही स्थाने पहा जिथे त्या बुध गुरु शुक्र चंद्र एकापाठोपाठ एक लिहिलेले असतील तर हा योग योग्य ज्योतिषांकडून चेक करून घ्या.
धन्यवाद…..!