प्रथम आपले वय सध्या कोणते सुरु आहे ते लिहा.
समजा जन्मतारीख आपली 1-11-1971 असेल तर अजून 2026 चा नोव्हेंबर महिना आला नाही म्हणून 2025-1971 = 54 वर्षे पूर्ण झाली आहेत आणि सध्याचे वय 55 सुरु आहे.
ह्या सुरु असलेल्या वयाला 54 ला आता 12 ने भाग द्या आणि भाग दिल्यावर जी संख्या उरते ती लिहा.
12 X 4 = 48 — 54 मधून आता 48 वजा करा उरलेली संख्या 6 येत आहे.
हा उरलेला 6 अंक खूप महत्वाचा आहे कारण 6 व्या भावाच्या (6th HOUSE) बद्दल च्या सर्व घटना ह्या पत्रिकेत पहाव्या लागतील.
आता असेच गणित आपल्या जन्मतारखेबरोबर करा आणि उरलेली संख्या किती आहे ते पहा.
जर उरलेली संख्या १ असेल तर पत्रिकेच्या पहिल्या स्थानाची घटना घडेल. जी आपल्या नवीन कार्यासंबंधी असेल. स्वतःला हव्या असलेल्या आवडीच्या विषयी प्रेझेंट करण्याचा प्रयत्न कराल. ह्या वर्षी आपण आपल्या क्षेत्रात खूप धावपळ कराल. आत्तापर्यंत आपल्याला जे आपल्या इच्छेचे मिळत नव्हते ते मिळविण्याचा प्रयत्न कराल.
जर उरलेली संख्या २ असेल तर हा विषय आपल्या सर्व पैशासंबधित आणि कुटुंब संबंधित असेल. कुटुंबातील विषयांसाठीची धावपळ दिसू शकेल विषय तेच असतील. किंवा कुटुंबासाठी लागलेला पैशा बद्दल चे विषय असू शकतील.
जर उरलेली संख्या ३ असेल तर आपण हा विषय आपल्या पराक्रमा साठी खूप मेहनत करण्याचा काळ असेल. अति धावपळ दिसेल. लहान भावाचे विषय आपल्यासमोर असतील.
जर उरलेली संख्या ४ असेल तर हा विषय आपल्या मातृसुखाचा आणि आपल्या प्रॉपर्टी संबंधाचा होऊ शकेल.
जर उरलेली संख्या ५ असेल तर हा विषय आपल्या संतानसुखाबद्दल आणि आपल्या स्किल बद्दल चा असू शकेल. प्रेम देणे घेणे त्यातील आट्याचमेंट चे विषय आपल्या समोर असू शकतील. एखाद्या खेळाबद्दल चे विषय , किंवा काहीतरी दुसरे आवडीचे शिकण्याचा विषय असू शकेल.
जर उरलेली संख्या ६ असेल तर हा विषय आपल्या नोकरी, कर्ज, आजारपण, शत्रू, स्पर्धा परीक्षा ह्याविषयी असू शकेल.
जर उरलेली संख्या ७ असेल तर हा विषय आपल्या वैवाहिक सुखाबद्दल चा असेल किंवा एखाद्या व्यवसायाबद्दलचा सुद्धा असू शकेल.
जर उरलेली संख्या ८ असेल तर हा विषय जरा कठीण दिसेल कारण इथे ८ वे स्थान ऍक्टिव्ह होईल. छोटे मोठे अपघात आणि यातना संबधित हे वर्ष असू शकेल तेव्हा काळजी घ्यावी. किंवा पूर्वजांच्या प्रॉपर्टी बद्दल विषय येतील. काहीही हि चुकीचे होत असेल असे वाटले तर एक सल्ला दिला आहे कि आपल्या समोर जे विषय येतील त्यात अगदी खोलवर कोणतेही रिसर्च करा. इतर ठिकाणी त्रास कमी होईल.
जर उरलेली संख्या ९ असेल तर नवीन भाग्योदयासंबधित आपण खूप सिरियस असाल आणि ते होताना दिसेल सुद्धा. परदेश गमन सुद्धा विषय येण्याचा संभव असेल. पुढील डेव्हलोपमेंट चे विषय चांगले किंवा वाईट असू शकतील. घर बदलणे , नोकरी व्यवसायातील कोणतेही बदल होणे हे विषय असतीलच.
जर उरलेली संख्या १० असेल तर कार्यक्षेत्राचा विषय आपल्याला ऍक्टिव्ह ठेवू शकेल. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व घटना चांगल्या किंवा वाईट ह्या वर्षी होऊ शकतील. वडिलांचा विषय सुद्धा असू शकेल. स्वतःच्या स्टेटस साठी चे सर्व विषय इथे येतील.
जर उरलेली संख्या ११ असेल तर प्रत्येक प्रकाचे लाभ आणि आपल्या इच्छा पूर्ती हा विषय सतत आपल्या समोर असेल. मोठा भाऊ संबंधित विषय सुद्धा असू शकेल.
जर आलेली ० असेल तर १२ व्या स्थानाचे फळ इथे मिळेल परदेश गमन, किंवा खूप खर्चाचे विषय हे आपल्या समोर असतील. हॉस्पिटल चे विषय सुद्धा नाकारता येत नाहीत.
नोट १– इथे फक्त आपणास आपल्या सुरु असलेल्या वयाचा विचार केला आहे. 2026 च्या 1 जानेवारीला आपले चालू वय पहा आणि त्यास १२ ने भाग द्या उरलेली संख्या जी असेल त्याचे फळ वाचा पण जर पुढे एक दोन महिन्यात आपले वय संपणार असेल फेब किंवा एप्रिल पर्यंतच तर त्यात १ अधिक करा आणि नंतर एप्रिल किंवा फेब पासून त्या स्थानाचे फळ चेक करा.
वरील दिलेल्या १/११/१९७१ मध्ये नोव्हेंबर पासून अंक ६ चे फळ मिळेल.
नोट २– इथे फक्त आपणास सुरु असलेल्या वयासंबधित विषय कळेल कि कोणत्या विषयीच्या घटना आपल्यासमोर असतील .
चांगल्या किंवा वाईट असतील हे त्या पत्रिकेत त्या स्थानाची ताकद पाहून ओळखता येईल कि त्या स्थानावरून आपणास आनंद किंवा दुःख मिळेल. म्हणून हा विषय ज्योतिषांसाठीचा असेल. योग्य मार्गदर्शन घेऊन हा विषय अधिक जाणून घेऊ शकता.
पण एव्हढे मात्र नक्की असेल कि विषय आलेल्या संख्येचाच असेल.
धन्यवाद।
श्री दत्तगुरु ज्योतिष
9821817768
7506737519
