You are currently viewing मीन राशी / मीन लग्न शनी चे मीन राशीतील भ्रमण | Shani Transit 2025
Shani Transit 2025 meen rashi meen langa
मीन राशी   मीन लग्न     शनी राशी परिवर्तन

Shani Transit 2025 meen rashi meen langa- येथे आपणास दिनांक २९/३/२०२५ पासून ते शनी मीन राशीत २३/२/२०२८ पर्यंत असताना तो आपल्याला साडॆसातीतील शेवटची अडीच वर्षे काय काय फळे देवू शकेल ते ते विषय मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

हे शनीचे भ्रमण सुरु असताना गुरु च्या अवस्था सुद्धा महत्वाच्या असतील
१४/५/२०२५ पर्यंत गुरु वृषभेत असेल
१४/५/२०२५ पासून ते २/६/२०२६ पर्यंत गुरु मिथुन राशीत असेल
२/६/२०२६ पासून २६/६/२०२७ पर्यंत गुरु कर्क राशीत असेल
२६/६/२०२७ पासून २४/४/२०२८ पर्यंत गुरु सिंह राशीत असेल

तसेच राहू १८/५/२०२५ पर्यंत मीन राशीत शनी बरोबरच असणार आहे
नंतर राहू १८/५/२०२५ पासून ५/१२/२०२६ पर्यंत कुंभ राशीत मागे जाईल
५/१२/२०२६ पासून २३/६/२०२८ पर्यंत राहू मकर राशीत असेल

आता ह्याला अनुसरून शनी चे मीन राशीतील मीन राशीला मिळणारे विषय मांडू

शनी २९/३/२०२५ पासून आपल्या मीन राशीला किंवा मीन लग्नाच्या पत्रिकेत प्रथम स्थानातून भ्रमण करणार आहे. साडेसातीच्या मधल्या चरणात तुम्ही २३/२/२०२८ पर्यंत असाल. हे स्थान आपल्या प्रेझेंटेशन चे आपल्या ऍक्टिव्हिटीचे आपल्या देह बोलीचे आहे. इथूनच आपल्या प्रत्येक युक्त्या ऍक्टिवेट होतात कारण इथेच तुमच्या डोक्याचा सुद्धा भाग तपासाला जातो.
शनी इथून भ्रमण करत असताना काही गोष्टी ज्या ज्या तुमच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडणाऱ्या आहेत त्यावर तो खूप मेहनत करायला लावेल. काही ऍक्टिव्हिटी करताना फार त्रास होईल किंवा कामे जलद होणार नाहीत संघर्ष वाढेल. म्हणून सावकाश ह्या विषयांना हाताळा. खास करून तब्येतीकडे लक्ष जरूर द्या. कोणताही आळशीपणा ह्या कालावधीत आता चालणार नाही रोज शारीरिक मेहनत ज्या व्यक्तींच्या होत आहेत त्यांना काही इशू नाही पण जर आपण फार कंफर्ट झोन मध्ये आरामदायक स्थिती मध्ये असाल तर शनी इथे आपल्या तब्येतीवर परिणाम करेल म्हणून व्यायाम करायलाच लागेल. विद्यार्थी दशेत असणाऱ्या मुलांना सुद्धा इथे त्याच्या आळशीपणाचा त्रास होईल. मेहनत करावीच लागेल.

ह्याच प्रथम स्थानात २९/३/२०२५ ते १८/५/२०२५ पर्यंत शनी राहू बरोबर असणार आहे वरील स्थानातील काही विषय डोकेदुखी बनत असतील तर अजिबात घाई करू नका थांबा १८/५/२०२५ पर्यंत थांबून नंतर निर्णय घ्या. कारण अजून राहू आपल्याच मीन राशीत किंवा मीन लग्न स्थानात असेल १८ मे पर्यंत. आपण जर राजकारणात असाल तर हा कालावधी शत्रून पासून त्रासाचा असेल.

शनीच्या ३ दृष्ट्या

ज्योतिष नियमा प्रमाणे शनी एखाद्या स्थानातून भ्रमण करीत असताना तो आपल्या त्या स्थानापासून ३ ऱ्या स्थानावर ७ व्या स्थानावर आणि १० व्या स्थानावर दृष्टी टाकीत असतो. शनीच्या ह्याच दृष्ट्या आपणास त्रासदायक होऊ शकतील पण ते ते स्थानातील विषय जर आपण व्यवस्थित हाताळले तर २३/२/२०२८ पर्यंत त्यात आपणास शनी काहीतरी उत्तम सोलुशन देऊन जाईल हे कायम स्वरूपात असेल कारण माझ्या मते शनीच्या ज्या ज्या स्थानावर दृट्या येतात त्या स्थानातील विषयाला शनी आपणास आपल्या मागील कर्माची फळे चांगली किंवा वाईट देत असतो आणि त्याची फळे तो आपल्याला भोगवुन पुढे क्लिअर करीत असतो.

आपल्या पत्रिकेत शनी ची ३ री दृटी हि जिथे २ नंबर ची वृषभ राशी लिहिली आहे तिथे आहे. हे स्थान आपल्या मेहनतीचे आहे, शहरो शहरी प्रवासाचे आहे, खूप कॉम्युनिकेशन चे आहे खूप जणांशी संपर्कात राहण्याचे आहे, जाहिरातीचे आहे. आणि लहान भावंडांचे सुद्धा आहे तसेच ते शेजाऱ्याचे सुद्धा असेल.
म्हणून वरील विषय हे आपल्या धावपळीचे होतील. हे विषय आले कि समजा पाय जागेवर राहणार नाही आपला. म्हणून सध्या कोणताही जॉब/व्यवसाय ह्यातील बदल चेक करून करा कि तिथे किती मेहनत करावी लागणार आहे आणि ती किती फायदेशीर असेल.

आपल्या पत्रिकेत शनीची ७ वी दृष्टी हि कुंडलीच्या सप्तम स्थानावर येत आहे जिथे ६ नंबर पहा कन्या राशी आहे. १८/५/२०२५ पर्यंत तिथे केतू असल्यामुळे त्वरित काही फळे अनुभवास येतील ह्या स्थानाचे विषय — विवाह होणे, जोडीदाराचे सुख पाहणे, एखादा व्यापार पाहणे, रोज पैसे कमविण्याचे स्थान हेच आहे. म्हणून शनी ची हि दृष्टी इथे आपणास अति व्यस्तता देऊ शकेल. आणि त्यातील जलद काही ऍक्टिव्हिटी होण्याची संभावना होईल. जसे विवाहाचे निर्णय, आणि व्यापार किंवा पार्टनरशिप. पण दिनांक १८/५/२०२५ पर्यंत इथे केतू असल्यामुळे काही विषय हे कटकटीचे आणि अति धावपळीचे होऊ शकतील लक्ष द्या आणि नंतर सावकाश निर्णय घ्या १८/५/२०२५ पर्यंत थांबा.

शनी ची १० वी दृष्टी आपल्या पत्रिकेच्या कर्म (दशम) स्थानावर येत आहे. जिथे शनी ची धनु राशी ९ नंबर पहा.
दशम स्थान हे आपल्या कर्माचे असते आपल्या स्टेटस चे असेल आणि आपल्या ऑफिस मधल्या बॉस चे सुद्धा असेल. ह्यातील काही विषय आपणास नक्की अनुभवास येतील.
दशम स्थानावर जेव्हा शनी ची १० वी दृष्टी येते तेव्हा आपणास आपल्या प्रोफेशन कडे अति लक्ष द्या तेथील काही बदल करावे लागतील किंवा निर्णय घ्यावे लागतील असे दिसते.

आपणास आणि आपल्या परिवारास शनीच्या मीन राशीतील साडॆसातीतील मधले चरण व्यवस्थित जावो हीच शनी महाराजांकडे प्रार्थना.

शनी ची हि वरील फळे फक्त जनरल आहेत तंतोतंत समजण्यासाठी आपल्या जन्म पत्रिकेचा शनी पहावा लागतो तो जन्माचा शनी कोणत्या स्थानात आहे. आपणास महादशा कोणती आहे. अष्टक वर्गात शनी किती गुण देत आहे. ह्यावरूनच एखादा ज्योतिषी आपणास आपल्याच कुंडलीचे निदान सांगू शकेल.

आता काही उपाय देतो.

शनी च्या साडेसातीतील मीन राशी ला सुरु असणारे मध्यम चरण सुरु असताना सर्व मीन राशीला सल्ला देण्यात येतो कि मागील ज्या ज्या चुका आपण केल्या असतील त्या पुन्हा करू नका. चुकीचे निर्णय होत असतील तर थांबा. अति गर्व अति विश्वास धोका होऊ शकेल त्यामुळे आपल्या राशीच्या गुरु ला स्ट्रॉंग करा त्यासाठी प्रत्येक गुरुवारी गुरु मंदिरात जाणे गुरुवारी गायीला चणा डाळ भिजवून नरम करून त्यात गूळ घालून द्यावे. आणि केसर चा टिळा नेहमी आपल्या डोक्यावर आणि नाभीवर लावत राहावा. एखादे गुरु वाचन करत राहावे काही होत नाही.

धन्यवाद।
श्री दत्तगुरु ज्योतिष
९८२१८१७७८
७५०६७३७१९

Leave a Reply