Table of Contents
वास्तुपूजन केव्हा केव्हा करावे?
अशी मान्यता आहे कि जेव्हा घर बांधले जाते आणि त्यासाठी जमीन खोदण्या अगोदर एकदा, नंतर घर बांधून झाल्यावर, आणि जर त्या घरात तीन महिने कुणीच राहत नसेल आणि आपण अशा वास्तूत राहायला गेल्यावर, घरात – वास्तूत मधमाशी चे पोळे तयार झाल्यावर आणि ते काढून झाल्यानंतर, कबुतरांनी घरात अंडी घालून पिल्ले दिली तर त्यांचे योग्य ठिकाणी स्थलांतरण करून झाल्यावर वास्तू ची वास्तुशांती करून घ्यावी. तसे वर्षातून एकदा तरी वास्तू पूजन किंवा नवग्रह पूजन केले जावे.
हेही वाचा :- वास्तूपुरुष मंडल
वास्तू शास्त्राची निर्मिती कोणी केली?
जेव्हा वास्तूच्या आणि घरा घरातील समस्या वाढत चालल्या तेव्हा ह्या वास्तू शास्त्राची ऋषीमुनींनी निर्मिती केली.
सर्वात पहिले ऋषी महर्षी भृगु आहेत ज्यांनी वास्तुशास्त्राची निर्मिती केली. त्यानंतर भृगु, अत्रि, वशिष्ठ, विश्वकर्मा, मय, नारद, नग्नजित, विशालाक्ष, पुरन्दर, ब्रह्मा, कुमार, नन्दीश, शौनक, गर्ग, वासुदेव, अनिरुद्ध, शुक्र आणि बृहस्पति(गुरुदेव).
ह्या १८ ऋषीमुनींना वास्तूचे उपदेशक किंवा प्रणेता मानतात. वेगवेगळ्या समयी ह्यांनी आपापले ज्ञान वास्तुशास्त्रात देत गेले.
हेही वाचा :- निर्मिती वास्तूशास्त्राची
वास्तूचे परीक्षण कोणत्या कोणत्या अंगाने केले जाते?
- स्ट्रक्चरल वास्तू — ज्या वास्तूचे परीक्षण नकाशाने केले जाते.
- रेमेडीअल वास्तू — घर वास्तुनियमाने बांधले गेले नसेल तर तेव्हा रेमेडीअल वस्तूचा उपयोग होतो
- एनर्जी वास्तू – ह्यात वास्तूचे निरीक्षण किती पोस्टिटीव्ह आहे आणि किती निगेटिव्ह आहे हे चेक केले जाते. ती जागा किती नकारात्मक आणि सकारात्मक आहे ह्याचा विचार केला जातो. ( हे ऑरा स्क्यानर ने चेक करतात)
हेही वाचा :- वास्तू मधील १६ दिशा आणि त्याच्या डिग्रीज
धन्यवाद…..!