Table of Contents
आपला मूलांक /भाग्यांक नंबर ७ कसा?
आपला मूलांक ७ आहे जर आपला जन्म कोणत्याही महिन्यात ७,१६,२५ तारखेला झाला असेल.
७ = ७
१६ = १ + ६= ७
२५ = २ + ५ = ७
वरील सर्व जन्म तारखेची बेरीज ७ वर येते म्ह्णून आपणा सर्वांचा मूलांक ७ असेल जर आपला जन्म ह्या तारखेने झाला असेल.
किंवा जर आपल्या जन्म तारखेची पूर्ण बेरीज केली असता ७ येते तर आपला भाग्यांक ७ आहे.
२ – ९ – १९९४ = २+९+१+९+९+४ = ३४ = ७ भाग्यांक होतो.
७ नंबर आणि केतु- स्वभाव/व्यक्तिमत्व आणि इतर बाबी
न्यूमेरोलॉजी मध्ये ७ हा अंक केतुचा आणि नेपच्युनचा आहे. ज्यांचा मूलांक किवा भाग्यांक ७ असतो आशा सर्व व्यक्तींवर केतु आणि नेपच्युनचा प्रभाव असतोच. केतु ला वरचे शीर नाही. त्यामुळे ७ नंबरच्या व्यक्ती ह्या आपल्या विश्वात असतात. जास्त आपल्यात मग्न असतात. हा अध्यात्मिक आहे त्यामुळे ७ नंबरच्या व्यक्ती ह्या जास्त भौतिकवादी मिळत नाही तर अध्यात्मिक असतात.
अशा व्यक्तींना मिळताना खूप मिळते नाहीतर काहीच मिळत नाही. शारीरिक भाषा वेगळी असते आपल्यातच हे लोक मग्न असतात. समाजात जास्त मिसळत नाहीत. अंतर्मुखी असतात. आतल्या आत नेहमी बैचेन असू शकतात. वर वर शांत वाटतात पण आतमध्ये स्वतःशी झगडत असतात. ह्या व्यक्ती अति रहस्यमयी वाटतात.
इंद्रिय डेव्हलप असतात ह्यांना कोणत्याही गोष्टीचा वास सुवास लगेच जाणवतो. घरात दूध जरी ओते जात असेल तर ह्यांना आधी वास येतो. नेहमी स्वतःला अलिप्त आणि असमाधानी मानतात. खूप काही प्राप्त झाले तरी त्या अचिव्हमेंट चा ते शो करत नाहीत. चेहऱ्यावर खूप काही मिळविल्याचा आनंद दाखवीत नाहीत. हे प्राणी प्रेमी असतात.
ह्यांना योग, रहस्य, विज्ञान, रिसर्च आणि अध्यात्म गोडी असते. भविष्याबद्दल ह्यांना अति चिंता असते. प्लॅनर चांगले असतात पण त्यावर कृती लगेच करत नाहीत. स्वप्ने ह्यांना नेहमी पडतात. ह्यांना पुढील गोष्टींचा सहज आभास होतो. मागील काही घडलेल्या जीवनातील गोष्टींबद्दल हे अति विचारी असतात. काही वेळा काही नवीन जागेत जाऊन ह्यांना मागील गोष्टी आठवतात.
हेही वाचा :- ६ नंबर मूलांक / भाग्यांक
करिअर / पैसा
जिथे जिथे स्वतःला क्रिएटिव्ह ठेवता येईल असे क्षेत्र निवडल्यावर समाधान होते. असे व्यवसाय किंवा नोकऱ्या जिथे जल शी संपर्क होतो जसे नेव्ही, वॉटर कंपनी केमिकल कंपनी. विडिओ एडिटिंग, आर्टिफिशिअल, सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग,मध्ये आपली प्रगती चांगली दिसेल.
ऍस्ट्रोलॉजी, नुमरॉलॉजी , धार्मिक गुरु, फेंग शुई हीलिंग, रेकी अशा ऑकल्ट सायन्स शी जुडल्यावर आपल्याला समाधानीक कार्यक्षेत्री आल्यासारखे वाटेल. फार्मसी, ऍक्टिंग, रायटर संबंधित सर्व क्षेत्रे ह्यांना आनंद देतात.
पैसा- पैसा ७ नंबर च्या व्यक्तींकडे येतोच पण हा विषय आपल्याला थोडा त्रास देऊ शकतो कारण आपल्याकडून बराच पैसा हा इतरांना मदत करण्यात जातो जो पुन्हा कधी परतून येत नाही ह्याचे कारण पहिल्या वेळी ठेच लागून सुद्धा आपण नेहमी अशाच व्यक्तीला मदत करता ज्याच्याकडून आधीच आपली फसवणूक झालेली असते. किंवा एक तरी रीलेशन आपल्या जीवनात असे असते कि ते आपल्यावर अवलंबून असते आणि त्यासाठी आपला पैसा हा बराच खर्च होतो.
ह्यांना करिअर मध्ये फार पळावे लागते, प्रवास जास्त करावा लागतो, जवळचा जॉब टिकत नाही, लांब जॉब असेल तर उत्तम सेवा पुरविताना दिसतात. पण त्यात सुद्धा इतर जबाबदाऱ्या फार असतात. खास हे ७ नंबरच्या महिलांकडे जास्त दिसून येते.
आपल्यातील कमीपणा आणि मार्गदर्शन
आपल्याबरोबर बऱ्याच वेळा काही लोक मिळून मिसळून वागत नाहीत कारण आपण जास्त अंतर्मुख आहात असे त्यांना सतत वाटते. त्यामुळे समाजात मिळून मिसळून राहण्याचा सल्ला आपल्याला दिला जातो. खूप योजना आपल्या अर्धवट राहू शकतात ह्याचे कारण थोडा आळशीपणा आपल्याला त्रास देऊ शकतो. समाधानी राहणे आपल्याला थोडे कठीण जाते त्यामुळे अध्यात्माची जोड देणे फार महत्वाचे आहे. मन शांत होण्यासाठी योग साधना जर केले तर ७ नंबर मूलांक किंवा भाग्यांक असणाऱ्यांना जास्त त्रास होत नाही.
७ नंबर च्या तरुण मुलींना खास सल्ला देण्यात येतो कि जास्त कुणावर विश्वास ठेऊ नये.
- शुभ रंग:- सफेद, क्रीम, हिरवा, पण सर्व लाईट घेणे
- अशुभ रंग:- काळा आणि लाल
- भाग्यवान दिवस:- सोमवार, रविवार
- लकी नंबर्स:- ७,१,२,४,६
- शत्रू नंबर:- ७ नंबर च्या व्यक्तींना शत्रू नंबर नाही तरीसुद्धा ८ आणि ९ हे नंबर ह्यांना शत्रुत्व किंवा नुकसान दायक असू शकतात. ज्या वयाची/वर्षांची किंवा तारखांची बेरीज सुद्धा ८ किंवा ९ येते ती वर्षे सुद्धा जास्त त्रासदायक असू शकतील. ९,१८,२७,१७,२६,३५,४४
- महिन्याच्या शुभ तारखा:- ७,१६,२५,१,१०,१९,४,१३,२२
- जीवनातील शुभ वर्षे:- ज्या वर्षाची बेरीज ७ येते उदारणार्थ २००५ किंवा ज्या वयाची बेरीज ७ येते अशी सर्व वर्षे आपल्याला शुभ असतात. ह्यात काही नवीन निर्णय सुरुवात करू शकता.
- आजार:- लहानपणापासून एखादा सुरु असलेला सतत चा आजार ह्यांना प्रथम त्रासदायक असतो पण नंतर ते त्यातून पूर्णपणे बाहेर येतात. डोकेदुखी, त्वचा, डोळ्यांचे आजार, हॉर्मोन्स, रक्तसंबंधीतील डिसीज ह्यावर जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त ७ आणि २ नंबर वाले मानसोपचारतज्ज्ञ कडे जाताना दिसतात.
महेंद्रसिंग धोनी, चार्ली चॅप्लिन, अरविंद केजरीवाल, हेमा मालिनी, करण जोहर, शाहिद कपूर, कमल हसन, अनुपम खेर.
वरील सर्व प्रतिष्ठीत व्यक्ती ह्या ६ शी संबंधित आहेत.
धन्यवाद…..!