You are currently viewing सप्त महाधनी योग I SHREEMANT YOG

सप्त महाधनी योग: ७ कुंडल्यात जिथे कुंडलीच्या ५ व्या स्थानी आणि लाभ स्थानी ग्रह लिहून दाखविले आहेत जर असेच ग्रह जर आपल्या कुंडलीत असतील तर हा एक सप्त महाधनी योग असतो. अशा व्यक्तीच्या जीवनात पैसा हा विषय कधीच काळजीचा नसतो. कारण तो मुळातच आपल्या कर्तृत्वाने महाधनि होतो.

  • पंचमात २/७ वृषभ किंवा तुला राशी असेल आणि त्यातच शुक्र असेल आणि लाभात मंगळ असेल तर असा व्यक्ति महाधनि होतो पण किती चरित्रवान असेल ह्यावर शंका येते. कुंडली क्रमांक १..
सप्त महाधनी योग 1
  • पंचमात ३/६ कन्या राशी असेल आणि त्यातच बुध असेल आणि लाभात चंद्र मंगळ गुरु असेल तर व्यक्ती महाधनि होतो. — कुंडली क्रमांक 2
सप्त महाधनी योग 2
  • पंचमात रवीची राशी ५ सिंह राशी असेल त्यातच रवी असेल आणि लाभात शनी चंद्र गुरु असेल — कुंडली क्रमांक ३
सप्त महाधनी योग 3
  • पंचमात शनी ची राशी १०/११ – मकर किवा कुंभ असेल आणि त्यातच शनी असेल आणि लाभात रवी चंद्र असेल — कुंडली क्रमांक ४
सप्त महाधनी योग 4
  • पंचमात गुरु ची राशी ९/१२ धनु किंवा मीन असेल आणि त्यातच गुरु असेल आणि लाभात बुध असेल तर — कुंडली क्रमांक ५
सप्त महाधनी योग 5
  • पंचमात मंगळ ची राशी १/८ मेष किंवा वृश्चिक असेल आणि मंगळ स्वतः तिथेच असेल आणि लाभात शुक्र असेल कुंडली क्रमांक ६
सप्त महाधनी योग 6
  • पंचमात कर्क राशी ४ नंबर असेल आणि त्यातच चंद्र असेल आणि लाभात शनी असेल तर कुंडली क्रमांक ७.
सप्त महाधनी योग 7

नोट — जशा ७ कुंडल्या काढून दाखविल्या आहेत त्याच स्थानी दाखविलेले ग्रह असावेत इतर ग्रह कोठेही असतील तरी चालतील.

धन्यवाद…..!

Leave a Reply