एकादशी मुहूर्त
- एकादशी तिथि प्रारम्भ : ८ जानेवारी रात्री ९:४० पासून
- एकादशी तिथि समाप्त : ९ जानेवारी संध्याकाळी ७:१७ पर्यंत.
- एकादशी पारण (उपवास सोडणे ) : १० जानेवारी सकाळी ७:१४ ते सकाळी ९:२७ पर्यंत.
- द्वादशी समाप्ती : दुपारी ४ वाजून ५२ मिनिटांनी.
काय करू शकता जरी आपण उपवास करीत नसाल किंवा असाल?
- सूर्य नारायणाला अर्ध्य द्या
- आज पिंपळाच्या झाडाची सेवा अवश्य करा (रात्री एक दिवा तुपाचा शिवाकडे आणि एक दिवा ह्या झाडाजवळ जरूर लावून या आणि मग पहा एका वर्षात सर्व असलेल्या समस्या कशा दूर होतील)
- आज घरात विष्णू सहस्त्र नाम जरूर वाचा ह्या व्रताचे पूर्ण फळ मिळेल
- आज घरात गीतेच्या ११ व्या अध्यायाचे वाचन जरूर करा पितृदोष आणि पितरांच्या गती प्राप्त होण्यासाठी खूप चांगले .
- कृष्णाला आज पंचामृताने जरूर स्नान घाला.
- कोणत्याही विष्णू अवताराचा जाप ज्याला तुम्ही मानता तो करत राहा पूर्ण दिवस जसे विठ्ठल कृष्ण राम .
- गरिबाला अन्नाचे दान करा.
- आज भांडण मोठे बोलणे खोटे बोलणे जरूर टाळा.
- आज अति सात्त्विक राहा.
- रात्री जमले तर जागरण करा कारण एकादशी चे जागरण करून सुद्धा ह्या व्रताचे फळ जास्त मिळते असे पुराणात सांगितले आहे.
- कोणत्याही जीव मात्राची सेवा जरूर करा पण त्याला कोणतीही इजा होणार नाही त्याची हत्या होणार नाही ह्याची दक्षता घ्या कारण विष्णू हा पालनकर्ता आहे आणि ह्या दिवशी एक कीड जरी आपल्याने मरत असेल त्याचे पाप पुढे सहन करावे लागते
एकादशी चे व्रत आणि नियम पाळून जरी तुम्हाला त्याचे फळ मिळत नसले तरी काही काळजी करू नका पुढील येणाऱ्या पिढ्या तुमच्या सर्व सुखासमाधानाने जीवन जगतील म्हणून घरात कोणी तरी एकाने हे व्रत जरूर पाळा .
एकादशी जप करण्यासाठी मंत्र
ॐ नमो भगवते वासुदेवाय , किंवा क्लीं कृष्णाय नमः
सफला एकादशी कथा
चंपावती नगरीत एक महिष्मान नावाचा राजा राज्य करत होता. राजाला चार पुत्र होते. त्यात सर्वात मोठा पुत्र लुम्पक हा महापापी होता. नेहमी वाईट कामे करण्यात तो अग्रेसर होता तो नेहमी आपल्या वडिलांचे धन वाया घालावीत होता सदैव देवता, ब्राहमण, वैष्णव यांची निंदा करण्यात त्याला आनंद वाटत होता.
ह्या त्याच्या अवगुणांना कंटाळून राजाने त्याला राज्याबाहेर काढून टाकले पण त्याचा राग म्हणून लुम्पक ने आपल्या राज्यातच चोरी करण्यास सुरुवात केली.
तो दिवसभर राज्या बाहेर राहत असे आणि रात्री तो आपल्याच राज्यात चोरी आणि इतर वाईट कर्मे करण्यासाठी येत असे. तो राजपुत्र होता म्हणून त्याला इतर जनता आणि त्या राज्याचे पहारेकरी पकडून सोडून देत असत. ज्या वनात तो राहत होता तेथे एक फार जुना पिंपळाचा वृक्ष होता त्याच झाडाखाली लुम्पक चे वास्तव्य होते.
ह्या एकादशी च्या आदल्या दिवशी तो तेथील अति गारठ्यामुळे मूर्च्छित झाला. एकादशी च्या दिवशी दुपारी थोडे वातावरण गर्मीने त्याला जाग आली. त्याचे शरीर अतिशय कमजोर झाले होते त्या रात्री त्याने काहीच खाल्ले नव्हते दुपारी जाग आल्यावर आजूबाजूला काही जी फळे पडली होती त्याने गोळा करून झाडाखाली ठेवली. आणि पूर्ण दिवसभर आणि रात्री जागरण केल्यामुळे त्याच्याकडून नकळत एकादशी चे व्रत घडले. आणि त्यामुळे विष्णू च्या आशीर्वादाने त्याचे मागील समस्त पाप नष्ट पावले.
लुम्पक ला जेव्हा हे सर्व अवगत झाले तेव्हा त्याच्यात आपोआप सुधारणा होऊ लागली त्याने आपल्या पित्याकडे जाऊन त्यांची क्षमा मागितली आणि पुढे त्या राज्याचा अधिभार पित्याने त्याच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेतला.
ह्या एकादशी च्या नावातच सफल हा शब्द असल्याने ह्या व्रताचे जो कोणी पालन करेल तो नक्की आपल्या जीवनात सफल होईल.
धन्यवाद…..!