You are currently viewing शनी केतू युती : एक शापित युती

शनी केतू युती एक शापित युती

आपल्या पत्रिकेत जर हि युती म्हणजे शनी आणि केतू एकत्र कोणत्याही एका स्थानी लिहिले असतील तर खाली दिलेला लेख आपल्यासाठी असेल.

शनी मेहनत, न्याय आणि कर्माचा कारक आहे आणि केतू धर्म मोक्ष आणि अध्यात्माचा रहस्याचा कारक आहे. हा शापित योग नेहमी व्यक्तीला नुकसान करणारा नसेल. उलट चांगल्या स्थितीतला हा योग व्यक्तीला अध्यात्माच्या मार्गावर नेतो. मोठे संत, प्रवचनकार ह्या युतीवर जन्माला आलेले दिसतात. मात्र हि युती जर सुस्थितीत नसेल तर व्यक्ती शापित योगाची अशुभ फळे भोगू शकतो.

शनी केतू च्या युतीच्या व्यक्ती आत्मज्ञान, गूढज्ञान, पंडिती ज्ञान, प्रेत ज्ञान, योग साधना, प्रवचन च्या विषयीच्या अभ्यासात मग्न झालेले पाहिले गेले आहे जेव्हा केतू चा प्रभाव त्या पत्रिकेवर असतो.
पशु पक्षी संवर्धन विषयी ज्ञान मिळविणे, जंगलातील गुफेतील पर्वतावरील वेगवेगळ्या विषयावर अभ्यास करणाऱ्या व्यक्ती ह्या युतीवर जन्म घेताना पाहिले गेले आहे.
देशाबाहेर राहून गुप्त गोष्टींचा विषय हाताळणारे व्यक्ती सुद्धा ह्या युतीवर जन्म घेताना दिसले आहेत.

ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत हि युती असेल त्यांना इंडिविज्युवल सुख घेताना जास्त पाहण्यात आले नाही.

जर हि युती अशुभ असेल तर अशा व्यक्ती अति डिप्रेशन च्या आहारी जाताना पहिल्या आहेत. कोणत्याही कामात त्यांना प्रगती करताना दिसले नाही. उदास जीवन जगणारे, काहीच करावेसे न वाटणे, एकांतात स्वतःला गुंतून टाकणे असे पाहण्यात आले आहे.

ह्या युतीची शुभ फळे केव्हा मिळतील

जेव्हा शनी मकर(१०) तुळेत(७) कुंभेत(११) कन्येत(६) वृषभेत(२) असेल. आणि असे असताना शनी च्या डिग्रीज जास्त असतील आणि केतू सुद्धा शुभ असेल तर हि युती व्यक्तीला शुभ फळे देतात.

ह्या युतीची वाईट फळे केव्हा मिळतील

शनी नीच राशीत म्हणजे मेष(१) मध्ये, सिंह-५ कर्क-४ वृश्चिक-८ किंवा शनी वक्री किंवा अस्त असेल त्याची डिग्री खूप कमी असेल आणि केतू सुद्धा अशुभ अवस्थेत असून जास्त डिग्रीत बसला असेल. तर इथे ह्या युतीची वाईट फळे मिळतील.

शनी केतू युती माझा सल्ला आणि उपाय

कोणत्याही परिस्थितीत जर हि युती असेल तर पहिले आपले रिलेशन सांभाळून राहिले पाहिजे
ज्या स्थानी हि युती असेल त्या स्थानाची फळे जन्म स्थानात राहून मिळत नाही असे मी नेहमी सांगत आलो आहे. त्यामुळे त्या स्थानापासून दूर जाऊनच ह्याची फळे मिळतील.

उदाहरणे —

  • जर शनी केतू युती द्वितीय स्थानी असेल तर कुटुंब सुख आणि धन सुख मिळविण्यासाठी कुटुंबाचा त्याग करावा लागेल.
  • जर शनी केतू युती चतुर्थ स्थानी बसली असेल तर मातृ सुखाचा त्याग केल्याशिवाय आईला सुख देता येणार नाही. किंवा तिला सुख मिळणार नाही.
  • जर शनी केतू युती पंचम स्थानात बसली असेल तर आपल्याकडे असलेल्या स्किल चा उपयोग आपण ज्या शहरात शिकलो त्याच शहरात होताना दिसला नाही.

अशी अनेक उदाहरणे त्यात त्या त्या स्थानाची देता येतील पण आपल्याला विनंती आहे कि ह्या युतीकडे हलके घेऊ नये कारण जर वाईट होणार असेल तर वयाच्या ४०/४२ नंतरच कुणाला तरी मार्ग मिळतो आणि नंतर डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ येते. म्हणून योग्य ज्योतिषाकडे जाऊन ह्या युतीचे ऑपेरेशन करून घ्यावे.

जरी नाही गेलात तरी रोज एक गायत्री माळ जपावी, आणि पितृदोषाचे उपाय करत राहावेत माझ्या ह्या विषयी पितृदोषाच्या ४ पोस्ट वाचून उपाय करावेत.

हि सर्व फळे शनी आणि केतू च्या महादशा अंतर्दशेत मिळतात. तेव्हा ह्या दशा महादशा आल्या कि योग्य तो सल्ला घेणे जरुरीचे असेल.

धन्यवाद…..!

Leave a Reply