You are currently viewing पुत्रदा एकादशी- ३० जुलै २०२०

पुत्रदा एकादशी नावातच पुत्र असल्याने ह्या एकादशीचे व्रत पुत्र होण्यासाठी असा घेतला असला तरी तो आत्ताच्या युगात मान्य नाही तेव्हा इथे पुत्रदा एकादशी चे व्रत सर्व निःसंतान आणि ज्यांना काही आपल्या मुलाबाळांपासून किंवा मुलाबाळांना कष्ट आहेत त्यांच्या चांगल्या भविष्या साठी पालकांनी हे व्रत जरूर करणे असे सांगितले आहे .

पुत्रदा एकादशी -कसे करावे व्रत

ह्या दिवशी निःसंतान पती पत्नी ह्या दोघांनी हे व्रत केल्याने चांगले फळ मिळते. संतान होण्यासाठी चे काही दोष दूर होऊ शकतील असे माझे मत आहे.

ह्या व्रतापासून पुढील वर्षापर्यंतच्या पुत्रदा एकादशी पर्यंत दोघांनी हे व्रत केले तर निःसंतान जोडप्याना त्याचे चांगले फळ मिळालेच पाहिजे असे माझे स्वतःचे मत आहे.आणि आपण एव्हढे प्रयत्न करत असाल तर हा प्रयत्न करून पाहण्यास हरकत नाही.

निःसंतान पती पत्नी ने पुत्रदा एकादशी चे व्रत असे करावे  

नियमा प्रमाणे एकदशी च्या आदल्या दिवशी दशमी करावी (पोळी भाजी खावी) भात नको.

सकाळ ची दिनचर्या आटोपून पतीने सूर्याला जल अर्पण करावे. 

नंतर पती पत्नी ने संतान होण्यासाठी पूजेच्या आधी देवाकडे कुलदेवतेचे नाव घेऊन संकल्प करावा 

ह्यात नेहमी ची जी पूजा असते त्यात छोट्या बाळ कृष्णाची खास पूजा दोघांनी मिळून करावी. 

त्याला एका स्वच्छ पात्रात (ताटात) बसवून दोघांनी त्याला पंचामृताने स्नान घालावे.

स्वच्छ करून जिथे तो आधी होता देवघरात तेथे ठेऊन दीप धूप दाखवून एक पिवळे फुल आणि तुलसी दल अर्पण करावे.

खडीसाखर किंवा  लोण्याचा नैवेद्य दाखवावा. नंतर समोर आसनावर बसून खालील मंत्र म्हणावा.

ॐ क्लिं देवकी सूत गोविंद वासुदेव जगत्पते

देहि मे तनयन कृष्ण त्वामहम् शरणम गतः 

हा संतान गोपाळ मंत्र आहे. ह्या दिवसापासून पुढे रोज हा मंत्र दोघांनी अथवा एकाने तरी रोज १०८ वेळा म्हणावा. सकाळी खास जर जमत नसेल तर संध्याकाळी तरी करावा.

एक वर्ष भरात खूप चांगले रिझल्ट आपल्यासमोर असतील ह्यात शंका नाही.

ज्यांना गर्भ राहून पडतो आहे अश्या स्त्रियांना — (सध्या जर आपण गर्भवती आहात तर)

पुत्रदा एकादशी ला वरील प्रमाणे पूजा करून खालील मंत्र १०८ वेळा म्हणावा.

मंत्र —क्लिं कृष्ण क्लिं  १०८ वेळा तुळशी च्या माळेवर केल्याने उत्तम.

त्यानंतर एक लाल धागा आपल्या कंबरेला बांधवा. 

ज्यांना लग्नाला ५ वर्षे झाली आहेत आणि संतान प्राप्ती झाली नाही अशा जोडप्याना

वरील प्रमाणे बाळ कृष्णाच्या पूजेत चंदन लाकडी अर्पण करावी , आणि हळदी चा टिळा कृष्णाला लावावा. आणि दोघांनी सुद्धा हा टिळा लावून संतान गोपाळ मंत्र म्हणावा वरील प्रमाणेच. आणि त्याबरोबर विष्णू सहस्त्र नामाचा पाठ करावा 

असे एक वर्ष केल्याने हा विषय पूर्ण क्लिअर होईल असे माझे मत आहे. 

जर लग्नाला ५ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक झाली आहे आणि अजून बाळ नाही

तर वरील प्रमाणेच सकाळी बाळ कृष्णाची पूजा करावी संतान गोपाळ कृष्णाचा मंत्र म्हणावा. आणि पुन्हा रात्री हा मंत्र दोघांनी मिळून म्हणावा १ माळा (१०८ वेळा). नंतर बाळ कृष्णाला ५ कोणत्याही पिवळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. 

समोर पुन्हा विष्णू सहस्त्र नाम म्हणावे आणि ते नैवेद्याचे ताट दोघांनी मिळून खावे 

नोट – ह्यात आपला उपवास असेल तर उपवासात फराळासाठी असणारे पदार्थ नैवेद्याला बनविणे. (सर्व पिवळे)

केसर घालून ५ प्रकारची मिठाई सुद्धा बनवू शकता. आणि त्यात एक दोन पिवळी फळे सुद्धा ठेवू शकता.

ज्यांना संतान आहे आणि त्यांच्या व्यवहाराने खूप ताप वाढला आहे अशा पालकांना

तुम्ही पुत्रदा एकादशी पासून प्रत्येक एकादशी ला बाळ कृष्णाला पंचामृताने अंघोळ घाला ते तीर्थ मुलांना पाजा एका वर्षभरात समस्या सुटलेल्या दिसतील. फरक पडेल.

विशेष नोट —सर्व निःसंतान आणि संतान असलेल्या पती पत्नींना

वरील प्रयोग सुरु केल्यानंतर तो प्रयोग प्रत्येक एकादशी ला पुढील श्रावणातील पुत्रदा एकादशी येईपर्यंत करावे ज्याने चांगले फळ मिळेल. त्याबारोबर पितृ दोष उपाय आणि गौ सेवा जरूर करावी.

हा विषय मिटविण्यास ह्या सारखा दुसरा उपाय नाही जेव्हा तुम्ही कोणत्याही मेडिकल ची हेल्प घेत असाल. त्याबरोबर मेडिकल ची हेल्प सुद्धा महत्वाची आहे हे लक्षात घ्या.

आणि अजून एक — हि जरी पुत्रदा एकादशी असली तरी पुत्र होण्यासाठी कुणीही वरील प्रोसेस अमलात आणू नये. फळ मिळणे कठीण.

जर पुत्रदा एकादशीला हे जमले नाही तर श्रावणात पुढे श्रीकृष्ण जन्मोत्सव येत आहे तेव्हा हा प्रयोग सुरु करू शकता. किंवा अजून एक पुत्रदा एकादशी येते तेव्हा हा प्रयोग करू शकता.

पुढील पुत्रदा एकादशी २३ जानेवारी २०२१ ला असेल

इतरांनी नेहमी प्रमाणे एकादशी करावी. ज्यांच्याकडे वरील समस्या काहीच नसतील.

धन्यवाद……!

Leave a Reply