आज मेष राशीचे (Mesh Rashi–Aries) पूर्ण विश्लेषण करू. मेष रास- एकदम सोप्या भाषेत तुम्हाला कळेल असेच लिहिणार आहे.
Table of Contents
मेष म्हणजे मेंढा
गायीच्या कळपाला सांभाळण्यासाठी ४/५ गुराखी लागतात तसे मेंढ्याच्या कळपाला एक पुढे आणि एक मागे असे दोनच गुराखी दिसतील हे का कारण एक मेंढा निघाला कि त्याच्या मागून त्याचे पाहून इतर अनुकरण करण्याची प्रवृत्ती असते ह्याची. हा स्वभाव किंवा ऍक्टिव्हिटी मेष राशीत असण्याची शक्यता फार असते.(Aries in Marathi)
मेंढ्या च्या डोक्यात त्याची जास्त ताकत म्हणून हे सतत टक्कर मारण्याचा लढाऊ पणा तेथून मिळतो.
एक मेंढा त्या घराचा पोशिंदा असतो त्याच्या जो जो उपयोग होतो त्यावरून म्हणून मेष राशीच्या व्यक्ती ह्या त्या घराची जबाबदारी घेण्यास लायक असतात बऱ्याच वेळी.
सर्वात पहिल्या क्रमांकाची पहिलीच राशी म्हणून मेष राशी ओळखली जाते. म्हणजे सर्वात आधी सर्वात पुढे असण्याची शक्ती युक्ती ह्या राशीला आपोआपच मिळते.
ह्या राशीचा मालक मंगळ (Mars)
ज्योतिष शास्त्रात मंगळ हा सैनिक लढाऊ ग्रह म्हणून मानला जातो त्यामुळे आपोआपच लढण्याची प्रवृत्ती येते नव्हे, लढावेच लागते.
तत्व — अग्नी
मेष राशीत ३ नक्षत्रे असतात अश्विनी भरणी कृतिका.
- ० ते १३ :२० डिग्री पर्यंत अश्विनी नक्षत्र – स्वामी केतू — देव गण —आद्य नाडी
- १३:२० ते २६:४० डिग्री मध्ये भरणी नक्षत्र – स्वामी शुक्र — मनुष्य गण — मध्य नाडी
- २६:४० ते ते ३० डिग्री पर्यंत कृतिका नक्षत्र – स्वामी रवी — राक्षस गण — अंत्य नाडी
ज्या डिग्री वर तुमचा जन्म चंद्र असेल त्याप्रमाणे नक्षत्र गण नाडी ह्याच्या ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला मिळतील.
सध्या नक्षत्र गण नाडी ह्या एकाच राशीत वेगवेगळ्या असतात म्हणून इथे देणार नाही जेव्हा ह्यावर अधिक प्रकाश पडेल तेव्हा तुमची डिग्री पाहून नक्षत्र गण नाडी बद्धल वाचू शकता आणि तुमच्या राशीचे कॉमन इफेक्ट त्यात मिक्स करू शकता.
सध्या कॉमन मेष राशी कशी आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.
मेष राशी स्वभाव – Mesh Rashi Personality
अग्नी तत्व आणि मंगळ राशीचा मालक एकदम कडक सतत उर्जावान उत्साही स्वाभिमानी सुद्धा आणि संघर्ष. कितीही हळवा स्वभाव असला तरी तो चेहऱ्यावर दिसणार नाही. स्वतःचे मत फायनल असेल कधी कधी त्यात फार बदल करून घेतील पण शेवटी स्वतःला वाटेल तेच करतील. हट्टी सुद्धा तेव्हढेच असतात. मर्दानी पणा सुद्धा असतो स्वभावात. लगेच राग येणे, ऍक्टिव होणे , ऍक्शन मध्ये येणे हा मूळ स्वभाव. ह्यांना समाजातील लोक जरा दबकूनच असतील.
हा स्वभाव केव्हा केव्हा नुकसान सुद्धा दाखवितो. जपावे .
संबंध – Relation
कोणतेही रिलेशन जपताना थोडा त्रास होतोच. खास वैवाहिक रिलेशन मध्ये जास्त त्रास होण्याची शक्यता असते . जर आपल्या टार्गेट वर असतील तर आणि रिलेशन इग्नोर करत असतील तर जास्त त्रास होत नाही. जास्त विचार करत राहिलात तर त्या रिलेशन चा त्रास होईल हा सल्ला.
मेष राशी ची देवता
मेष राशी ची देवता श्री गणेश आणि हनुमंत आहे. ह्या देवतेची पूजा अर्चना सतत आयुष्यभर केल्याने मेष राशीचा स्वामी मंगळ हा पत्रिकेत चांगले परिणाम देऊन ह्या व्यक्ती सतत अग्रेसर असतील.
मेष राशी चे दान
- मेष राशी च्या लोकांनी वर्षातून एकदा तरी रक्त दान करावे.
- श्रम दान करणे सुद्धा मेष राशीच्या लोकांना शुभ असते.
- श्रम दानात कोणत्याही एका संस्थे साठी किंवा सामाजिक बांधिलकी बाळगून सार्वजनिक ठिकाणी आपली सेवा जरूर द्यावी. प्रगती नेम आणि फेम तुमची वाट पाहील.
मेष राशी च्या विद्यार्थ्यांसाठी – Mesh Rashi For Student
मेष राशींच्या विद्यार्थांनी कधीही आईला हर्ट करू नये. कारण मेष राशी पासून ४थे स्थान हे चंद्राच्या कर्क राशी चे आहे. अभ्यास करताना गणेशाला दुर्वा वाहून आणि हनुमान चालीसा चे पठण करणे रोज हे विद्या प्रगती साठी उत्तम साधना असेल. प्राथमिक आणि विद्यालयीन शिक्षणात कोणत्याही एका खेळा बद्दल रुची असेल तर ती पुढे सुरु ठेवणे हितावह ठरेल. मेडीकल, इन्जीनियरिंग, राजनीति शास्त्र, रसायन शास्त्र ह्यात शिक्षण जास्त चांगले असेल
मेष राशी च्या ५ ते १२ वयातील लहान मुलांसाठी – For Small Childrens
ह्या राशीच्या मुलांना घरात डांबून ठेऊ शकत नाही. उपद्व्याप करतील कुठे तरी उडी मारण्याचा. खास ८ व्या राशी मंगळवार आणि दुपारची वेळ १ ते ३ मधील डोक्याला मार लागून किंवा उंचावरून पडण्याचा संभव असतो त्यासाठी आई वडिलांनी विशेष काळजी घ्यावी. असे झाले तर तिथून पुढे भाग्योदयाला नवीन सुरुवात सुद्धा होते हे तितकेच खरे वर्षभरात काही नवीन घटना घडतात आयुष्याला कलाटणी देणारे चांगले किंवा वाईट दोन्ही.
ह्या वयातील मुलांना दिवसातून एकदा तरी लाल माती च्या मैदानात फिरण्यासाठी किंवा खेळण्या साठी न्यावे म्हणजे त्यांचा मंगळ हा ऍक्टिव्ह होईल नंतर ते घरी असताना शांत होतील जास्त चीड चीड करणार नाहीत . ह्या वयात असणाऱ्या मेष राशींच्या पालकांना ही पोस्ट जरूर फॉरवर्ड करावी.
मेष – इष्ट मित्र – Best Friend
- कुंभ राशी मैत्रीसाठी चांगली.
- सिंह, धनु, मिथुन राशी बरोबर मैत्री असते पण त्यात मिथुन राशी बरोबर खास वाद होतात.
- वृष, कन्या, वृश्चिक एवं मीन बरोबर समभाव असेल.
मेष राशी च्या वृद्धांना – Mesh Rashi For Senior Citizen
६० + वृद्धांनी आपल्या ब्लड प्रेशरवर कंट्रोल करावा. आधी एखादे झालेले ऑपशन असेल तर पुन्हा त्यावर प्रक्रिया करावी लागणार नाही ह्यावर लक्ष द्यावे. घरातील रिलेशन मुलांपासून चे सांभाळून घ्यावे जास्त ऑर्डरफूल राहू नये. त्रास कमी होतील ह्याने. तसे मेष राशीच्या वृद्धांचे जीवन हे सुंदर म्हणायला हरकत नाही कारण एकदा सोल्जर रिटायर झाल्यावर जसा असतो तसा समजावा.
मेष राशीच्या स्त्रियांना – Mesh Rashi For Womens
मेष राशी च्या वैवाहिक स्त्रियांनी जर घरात ते मोठे असतील तर एकत्र कुटुंबात सांभाळून घ्यावे. सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करावा जास्त सेवा घेऊ नये. जमेल तेव्हढे सांभाळून घ्यावे. मेष राशीच्या सर्व स्त्रियांना रिटर्न गिफ्ट मिळेलच असे नाही दिलेल्या सर्व्हिस बद्दल त्यामुळे जास्त आशा बाळगू नये त्रास होईल.
मेष राशी शुभाशुभ
- मेष राशी ला ९ अंक भाग्यशाली आहे
- मेष राशीसाठी मंगळवार आणि त्याबरोबर रविवार, गुरुवार शुभ आहेत –शुक्रवार अशुभ आहे.
- मेष राशीला लाल सफेद रंग शुभ आहे. स्वतःजवळ एक लाल रुमाल असणे हे नेहमी शुभ असते. मनगटावर एक लाल धागा सुद्धा बांधू शकता खास मंगळवारी नेहमीसाठी.
शेवटी मेष राशींच्या सर्व जणांना एक सल्ला आयुष्यात पुढे जाण्यासाठी थोडे नमते घ्यावे. समोरच्याला सांभाळून घ्यावे. आणि आपले काम करून घ्यावे. हा आहे.
सध्या एव्हढे पुरे…
विशेष नोट :- सर्व राशींबद्दल लिहिताना तुमच्या कंमेंट वाचून किंवा अजून काही अभ्यास करता करता ह्यात बदल केले जातील किंवा अजून काही पॉईंट्स टाकले जातील. तेव्हा सर्व मेष राशींच्या माझ्या मित्र मैन्त्रिणींसाठी एक विनंती आहे कि हा लेख पूर्ण समजू नये. वेळोवेळी ह्याचे अपडेट वाचत जावे. निदान वर्षातून २/३ वेळा तरी.
शेवटी प्रत्येकाने आपल्या राशी बद्दल जे जे मिळेल ते ते घेत राहावे जीवन सुखकर होण्यासाठी.
आणि महत्वाचे :-काहीही चुकीचे असेल तर ते पॉईंट इग्नोर करावेत सोडून द्यावेत.
Sir you have suggested me to go through your blog , but i can’t read marathi clearly as english, i request you to kindly give option for english also.
एकदम बरोबर आहे, माझ्या बाबतीत तर सर्व लागू होत हे… १००% accurate, khup chhan