म्हातारपण सुखात जाण्याचा योग- पत्रिकेत द्वितीय स्थानाचा (२ ऱ्या स्थानाचा) मालक जर भाग्य स्थानात म्हणजे नवम स्थानात किंवा एकादश स्थानात म्हणजे लाभ स्थानात बसला असेल तर बाल्यावस्था नंतरचे जीवन उतार वयापर्यंत फार सुखात जाते. अशा व्यक्तीला कुटुंबात मान सन्मान असतो. त्याला त्या वयात लागणारे सर्व प्रकारचे सुख समोर असते. (ENJOYING IN OLD AGE YOGA)
मात्र अशा योगात बालवय अति कष्टाचे गेलेले पाहण्यात आले आहे.
कुंडलीचे दुसरे स्थान हे कुटुंब स्थान आहे आणि ह्या स्थानाचा मालक हा भाग्य स्थानी किंवा लाभ स्थान इथे बसला असल्यामुळे असे घडते.
हेही वाचा : कुलवर्धन / कुलदीपक राजयोग
उदाहरण कुंडलीत फक्त समजण्यासाठी दुसरे स्थान भाग्य स्थान आणि लाभ स्थान दाखविले आहेत.
- दुसऱ्या स्थानात जर १ किंवा ८ असेल तर मंगळ भाग्य किंवा लाभ स्थानात लिहिला असेल.
- दुसऱ्या स्थानात जर २ किंवा ७ असेल तर शुक्र भाग्य किंवा लाभ स्थानात लिहिला असेल.
- दुसऱ्या स्थानात जर ३ किंवा ६ असेल तर बुध भाग्य किंवा लाभ स्थानात लिहिला असेल.
- दुसऱ्या स्थानात जर ४ असेल तर चंद्र भाग्य किंवा लाभ स्थानात लिहिला असेल.
- दुसऱ्या स्थानात जर ५ असेल तर रवी भाग्य किंवा लाभ स्थानात लिहिला असेल.
- दुसऱ्या स्थानात जर ९ किंवा १२ असेल तर गुरु भाग्य किंवा लाभ स्थानात लिहिला असेल.
- दुसऱ्या स्थानात जर १० किंवा ११ असेल तर शनी भाग्य किंवा लाभ स्थानात लिहिला असेल.
हा योग आपल्या कुंडलीत नसला तरी काळजी करू नये उतार वयात सुखी ठेवणारे अजून योग असतात पत्रिकेत तरी हा एक योग असेल तर १००% असेच होते.
धन्यवाद…..!