You are currently viewing खंडग्रास चंद्र ग्रहण २८-२९ ऑक्टोबर २०२३

काय असते चंद्र ग्रहण

जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वी एका रांगेत येतात तेव्हा चंद्र आणि सूर्य च्या मध्ये पृथ्वी येते तेव्हा पृथ्वी ची चंद्रावर आंशिक किंवा पूर्ण छाया पडते ह्याने चंद्र बिंब काळा दिसतो ह्या प्रोसेस ला चंद्राला ग्रहण लागले असे म्हणतात.

ग्रहण लागल्याबरोबर चंद्र हा पृथ्वीच्या उपछायेत प्रवेश करतो त्याला इंग्रजी मध्ये (PENUMBRA) असे म्हणतात. नंतर हळू हळू चंद्र पृथीच्या वास्तविक छायेत पदार्पण करतो ह्याला भुभा (UMBRA) असे म्हणतात. ह्यात वास्तविक चंद्रग्रहण होते.

पण बऱ्याच वेळा चंद्र भुभा मध्ये प्रवेश करतच नाही आणि ग्रहण काळ संपतो ह्या प्रोसेस ला उपछाया चंद्रग्रहण असे म्हणतात. ह्यात चंद्र अगदी नेहमी प्रमाणे दिसतो. अगदी सूक्ष्मपणे पाहिले तर त्यावर काही सावली दिसते नाहीतर चंद्र ह्यात स्पष्टच दिसतो.

चंद्र ग्रहण २८ ऑक्टोबर २०२३ वेध, स्पर्श, मध्य आणि मोक्ष वेळा.

  • खंडग्रास चंद्रग्रहण चंद्रग्रहण प्रारंभ २८ च्या मध्यरात्रि १:०६ मिनिटांपासून ते २:२२ पर्यंत
  • उपच्छाया पहिला स्पर्श – २८ ऑक्टोबर रात्रौ ११:३२
  • प्रच्छाया चा पहिला स्पर्श – १:०६ मिनिट –(आरंभ)
  • परमग्रास चन्द्र ग्रहण – १:४४ मिनिट (मध्य)
  • प्रच्छाया अन्तिम स्पर्श – २:२२ मिनिट (मोक्ष)
  • उपच्छाया अन्तिम स्पर्श – ३:५५ मिनिट
  • सुतक काळ २८ ऑक्टोबर दुपारी ३:१५ पासून ते सूतक समाप्ती २९ ऑक्टोबर २:२२ एम

चंद्र ग्रहण कोठून दिसेल

पूर्ण भारतात हे चंद्रग्रहण दिसेल तसेच यूरोप, एशिया, ऑस्ट्रेलिया, अफ्रीका, नॉर्थ अमेरिका, उत्तर व पूर्व दक्षिण अमेरिका, अटलांटिक महासागर, हिन्द महासागर, अंटार्कटिका ह्या प्रांतातून सुद्धा दिसेल.

हिंदू धर्म आणि चंद्र ग्रहण

चंद्र ग्रहण हि घटना एक खगोलीय असली तरी हिंदू धर्मातील धार्मिक घटना आहे ज्याला धार्मिक दृष्टीकोनातून विशेष महत्व आहे जर चंद्र ग्रहण उघड्या डोळ्यांनी स्पष्ट दिसत असेल तर त्यास धार्मिक महत्व नाही, केवळ पेनम्ब्रल चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. म्हणूनच पंचांग मध्ये समाविष्ट नाहीत. आणि म्हणून ग्रहणाशी संबंधित कोणतेही विधी केले जात नाहीत.
केवळ उघड्या डोळ्यांनी दिसणारे ग्रहण हे धार्मिक मानले जाते. जेव्हा तुमच्या शहरातून चंद्र ग्रहण दिसत नसेल तेव्हा तिथे कोणतेही नियम पळाले जात नाहीत. परंतु जर हवामानामुळे ग्रहण दिसत नसेल तर मात्र सुतक आणि ग्रहणाचे नियम पाळावेत.

ग्रहणात किंवा ग्रहण संपल्यावर करण्याची महत्वाची कृत्ये

दिवाळीची अमावस्या, होळीची पौर्णिमा आणि ग्रहण काळ ह्या वेळी कोणत्याही मंत्रांची सिद्धी, यंत्र सिद्धी , साबार मंत्र वगैरे करण्यास हे दिवस अति महत्वाचे असतात. ह्या काळात जो आपल्या इष्ट देवतेचा जप असेल तो केल्याने त्याचे बरेच लाभ होतात.

ग्रहण काळात एकदा सिद्ध केलेले मंत्र हे आपल्या जीवनात जेव्हा जेव्हा संकटे येतात तेव्हा तेव्हा ह्या मंत्राचा जप केल्याने व्यक्ती त्या संकटातून मुक्त होतो. मात्र तो एकच मंत्र किंवा कोणताही प्रयोग प्रत्येक ग्रहण काळात चार्ज केलाच पाहिजे.

त्यामुळे वर्षातून वर उल्ल्लेखलेलं जे जे दिवस असतील त्यात त्या वेळी मंत्रसाधना करावीच. काहीच करता येत नसेल तर निदान चंद्र ग्रहणाच्या वेळी चंद्राचा मंत्र आणि सूर्य ग्रहणाच्या वेळी सूर्याचा मंत्र किंवा हनुमान चालीसा नक्की करावी.

स्पर्श, मध्य आणि मोक्ष ह्या ग्रहणाच्या महत्वाच्या वेळा असतात. त्या पूर्ण वेळेत कोणतीही साधना पूर्ण वेळ करता ये नसेल तर निदान त्या ग्रहण काळाचा मध्य वेळ असतो त्याच्या मागे पुढे २०/२० मिनिटे बसून साधना नक्की करावी.

सुतक काळात घरातील पाण्यात जेवणात तुळशीचे पान किंवा कुशा टाकून ठेवावे.

ग्रहण मोक्ष झाल्यानंतर स्नान करावे अगदीच शक्य नसेल तर हाथ पाय धुवून शरीरावर आणि घरात गंगाजल शिंपडावे.

ग्रहण संपल्यावर पुढील सूर्यदयाला स्नान करून गरिबांना किंवा ब्राह्माणांना चंद्राच्या वस्तूंचे दान करावे जसे दूध, तांदूळ , सफेद कपडे, सफेद वस्तू वगैरे.

जर नोकरी धंद्यात काही त्रास सुरु असतील तर चंद्र ग्रहण संपल्यावर मोती किंवा सफेद मोतीनी बनविलेले आभूषण दान करावेत.

जर संततीच्या बाबतीत काही त्रास असेल तर ग्रहण संपल्यावर दूध कपडे खेळणी गरीब लहान मुलांना द्यावेत.

घरातील क्लेश जाणवत असतील तर साखर किंवा सफेद कपडे दान करावेत.

जर कोणत्याही आर्थिक समस्या असतील तर दूध आणि भात ह्याची खीर बनवून ती दान करावी.

जर घरात काही आजारपण दिसत असतील तर एका काचेच्या बाऊल मध्ये पाणी भरावे आणि त्यात त्या आजारी व्यक्तीने चेहरा पाहावा नंतर ते काचेचे बाऊल गरिबाला दान करावे.

वरील कोणत्याही प्रकारची दाणे जशी जमतील तशी करावीत ह्यात कोणताही नियम नाही. अगदी काही देण्यास शक्य नसेल तर जे घरात नेहमी वापरात येणारे तांदूळ, गहू, बटाटे, तूप, गूळ हे थोडे थोडे काढून ठेवावे आणि ग्रहण सुटल्यावर सकाळी अंघोळ करून ब्राह्मणाला दान करावे किंवा देवळात ठेवून यावे आणि आपल्या समस्येबद्दल, कुटूंबाच्या रक्षणाबद्दल प्रार्थना करावी.

चंद्र ग्रहांमुळे होणारे राशींवरील परिणाम

हे ग्रहण चंद्र मेष राशीत असताना लागत आहे. चंद्र अश्विनी केतूच्या नक्षत्रात असेल. त्यामुळे ज्यांची मेष राशी आहे ज्यांना केतू ची महादशा आहे किंवा ज्यांचं पत्रिकेत चंद्र केतू एकत्र आहेत त्यांनी पुढील १५ दिवस कोणतेही मोठे निर्णय घेऊ नयेत. आरोग्याची काळजी घ्यावी. अचानक आलेल्या घटना दिसण्याची दाट शक्यता आहे.

  • मेष राशी– हानी, मोठे निर्णय नको पुढील १५ दिवस जपावे.
  • वृषभ राशी – खर्चाचे प्रमाण वाढेल.
  • मिथुन राशी — लाभ होतील
  • कर्क राशी — सुखदायक घटना
  • सिंह — मानसन्मान सांभाळावा लागेल
  • कन्या — विशेष सावधानी बाळगावी कष्ट होण्याचे प्रमाण वाढेल.
  • तूळ — वैवाहिक जीवनातील समस्या.
  • वृश्चिक — सुखदायक
  • मकर – मानसिक चिंता
  • कुंभ — लाभदायक
  • मीन — नुकसान, हानी.

धन्यवाद।
श्री दत्तगुरु ज्योतिष
९८२१८१७७६८
७५०६७३७५१९

Leave a Reply