You are currently viewing दसरा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक- विजया दशमी

विजया दशमी (दसरा)
गुढीपाडवा
अक्षय तृतीया
हे तीन मुहूर्त आणि अर्धा मुहूर्त दिवाळीचा पाडवा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा).

अश्विन शुद्ध दशमी तिथीला हा महोत्सव साजरा केला जातो. ह्या वर्षी दिनांक २५ ऑक्टोबर ला सकाळी ७:४४ ला दशमी तिथी ला सुरुवात होत आहे आणि दिनांक २६ ऑक्टोबर ला सकाळी ९:०२ मिनिटांनी दशमी तिथी संपत आहे.

दशमी तिथीला विजय मुहूर्त हा अपराह्न (दुपारची वेळ) असतो त्यामुळे दुसऱ्या दिवशी हा मुहूर्त पाळता येत नाही.

दुसरे कारण रावण दहन हे सूर्यास्ताच्या च्या नंतरच असते आणि दिनांक २६ ऑक्टोबर २०२० ला सकाळी ९ नंतर एकादशी सुरु होत आहे. (एकादशी हि २७ ला आहे) म्हणून ह्या कारणाने दिनांक २५ ऑक्टोबर ला विजयादशमी उत्सव (दसरा) साजरा केला जाईल.

हेही वाचा :- नवरात्रातील अष्टमी किंवा नवमी हवन कसे करावे

विजयादशमी मुहूर्त

विजय मुहूर्त :१४:१७ पासून १५:०३ पर्यंत आहे.

विशेष महत्व

  • रामाने रावणावर विजय मिळविलेला दिवस
  • साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस
  • आयुधे / शस्त्रे पूजनाचा दिवस
  • शमी पूजन करण्याचा दिवस
  • विद्या पूजन दिवस
  • दुर्गा विसर्जन दिवस

१ ) विजया दशमी असत्यावरील सत्याचा विजय रामाने रावणावर केलेली मात म्हणून हा उत्सव काही ठिकाणी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाथ चा पुतळा जाळून श्री रामाचा विजय साजरा केला जातो.

२) साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याकारणाने ह्या दिवशी बरेच जण ह्या मुहूर्तावर नवीन गृह प्रवेश, वाहन खरेदी , आणि देव उठनी एकादशी तुलसी विवाह नंतर विवाह मुहूर्त सुरु होत असल्यामुळे मंगल कार्यास लागणारे सोने चांदी दाग दागिने घेण्यासाठी तत्पर असतात.

३) ह्या दिवशी शस्त्र पूजनाला सुद्धा महत्व आहे. ज्या ज्या शस्त्रापासून आपण आपली रोजी रोटी चालवितो त्याची ह्या दिवशी पूजा अर्चा केली जाते. आणि त्याचा ह्या दिवशी उपयोग केला जात नाही. सल्ला — ह्या दिवशी आपल्याकडील शस्त्रे हे आपले लॅपटॉप, कॉम्पुटर, मोबाइल, मानून त्याची पूजा करावी असे माझे मत आहे. कारण त्यानेच जर आपली रोजी रोटी चालत असेल तर हे नक्की करावे. ह्याशिवाय कुणाची ज्या ज्या आयुधांनी पोट भरते अशा सर्व शस्त्रांची पूजा करावी.

४) विद्यार्थी ह्या दिवशी पाटीवर सरस्वती यंत्र काढून आपल्या वह्या पुस्तकांची पूजा करतात. कारण बरेच जण पहिला श्री गणेशा आपल्या एकदम लहान मुलांना ह्याच दिवशी पाटी घेऊन शिकवितात. पुढील त्याच्या अभ्यासात सुंदर प्रगती व्हावी हा हेतू असतो.

५) ह्याच मुहूर्तावर काही व्यापारी आपले हिशोबाची नवीन सुरुवात करण्यासाठी वही खाते लिहितात.

६) महाराष्ट्रात एकमेकांना भेटून आनंद साजरा करण्याच्या हेतूने आणि मोठ्यांचा आशीर्वाद घेण्याच्या हेतूने ह्या दिवशी सोने वाटप सुद्धा केले जाते. ( पानांच्या स्वरूपात) **इथे त्याचा उल्लेख त्या पानाचे नाव घेऊन करता येणार नाही आणि ह्या दिवसात तसे करू नये)

७) बंगाल मध्ये दुर्गा पूजेला ह्या दिवशी फार महत्व आहे आणि तेथे हा सण दिवाळी सारखा साजरा होतो. हा उत्सव पाहण्यासाठी तेथे देश विदेशातून लोक येत असतात

८) ह्या दिवशी शमी पूजनाचे सुद्धा महत्व आहे कारण १२ वर्षाच्या अज्ञात वासात असताना अर्जुनाने ब्रिहन्नला चे रूप घेण्याअगोदर आपली शस्त्रे ह्याच झाडाखाली लपवून ठेवली होती.

९) ह्या दिवशी देवी च्या घागरी ज्या ९ दिवस पूजलेल्या असतात त्या जलप्रवाह करतात. आणि दुर्गा विसर्जन सुद्धा केले जाते.

ह्या विजयादशमीच्या उत्सवापासून आपल्या आयुष्यात एक नवीन उमेद ,बळ निर्माण करून आपल्या कार्यात आपल्याला नेहमी विजयश्री प्राप्त होवो अशी आशा बाळगतो.

आपणा सर्वाना विजया दशमी च्या हार्दिक शुभेच्छा

धन्यवाद…..!

Leave a Reply