You are currently viewing पितृदोष भाग २

पितृदोष आणि माझे मत पत्रिका न चेक करता जाणून घ्या आपल्या घराण्यात पितृदोष आहे का ?

१) हल्लीच्या प्रायव्हसीज च्या जमान्यात सर्व घराण्यात हा दोष आढळून येतोच ह्याचे कारण पितरांच्या जबाबदारी पासून ह्या ना त्या कारणाने आपण वेगळे राहत असतो. त्यामुळे हा एक बेसिक पितृदोष मानण्यात येतो असे माझे मत आहे.
हे जीवन जगताना आपण आपल्या पितरांच्या सेवेपासून लांब असतो. हा भाग अति महत्वाचा असतो.
पण हे भोग आपल्या पत्रिकेत सुद्धा पाहायला मिळतात हे आपल्या मागील जन्माचे भोग असल्याने सुद्धा असे घडत असावे असेच माझे मत आहे.

२) जर आपण शनिवार मंगळवार जन्म घेतला आहे किंवा मागील पिढ्यांच्या जन्म मृत्यू वार सुद्धा शनिवार मंगळवार असतील तर अशा घराण्यात पितृदोष असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

३) ८ आकड्याशी ह्या दोषाचा संबंध:- जन्म तारखेत जास्तीत जास्त ८ असणे. किंवा आधीच्या पितरांच्या मृत्यू दिनांक मध्ये जास्तीत जास्त ८ हि संख्या येणे. ह्यात सर्वांची बेरीज केल्याने सुद्धा ८ यावी हा सुद्धा संयोग असू शकतो. उदा. ८+८+१९८८ (ह्यात ८ आकडे जात आहेत) दुसरे उदा. १८+४+१९८४ = ३५ –३+५=८ (ह्यात सर्व आकड्यांची बेरीज ८ येते) असे असेल तर आपल्या घराण्यात हा बेसिक दोष असू शकतो.

४) खास करून शनिवारी आणि मंगळवारी जर घरात अति क्लेश होत असतील .

५) जर घरात कुणाला कोणताही शारीरिक त्रास नसताना सुद्धा संतती होत नसेल बरीच वर्षे लग्नानंतर तर हा सुद्धा पितृदोषाचा भाग असू शकतो.

६) आपल्या आजी आजोबानी आईवडिलांनी आपण स्वतः पितरांची किती जबाबदारी घेतली नसेल तर पितृदोष निर्माण होतोच होतो.

७) परिवारात जर कुणाचा अकाल मृत्यू झाला असेल — एकापेक्षा जास्त (जसे अचानक अपघात, खून ) ह्यात घराण्यात बहुतेक जणांच्या पत्रिकेत कुटुंब स्थानात , अष्टमात आणि पंचमात राहू शनी असण्याची दाट शक्यता असते.

८) जर परिवारात कुणी परिस्थितीने किंवा जाणून बुजून गर्भपात (ऍबॉर्शन) केलेले असेल तर हा भयंकर दोष असू शकतो पुढे ह्यात मुलाबाळांच्या वैवाहिक सुखात व्यत्यय येताना दिसतातच. ह्यात त्या मुलाच्या पत्रिकेच्या तिसऱ्या स्थानी पापग्रह असतातच शनी मंगळ राहू केतू रवी सारखे.

९) जर आपण आणि आपली मागील घराण्यात अमावस्या आणि इतर मोठ्या कार्यात पितरांना आठवण केली गेली जात नसेल.

१०) कोणत्याही प्रकारचे श्राद्ध कर्म करत नसू.

११) धर्माच्या विपरीत आचरण असेल. ह्यात नवम स्थानी मंगळ राहू केतू सारखे ग्रह असण्याची दाट शक्यता असते.

१२) मागील एखाद्या घराण्यात स्त्री चा छळ झाला असेल (राहू ७ व्या स्थानी येतो पत्रिकेत) म्यारीड लाईफ डिस्टर्ब होतेच.

१३) माझ्या अभ्यासाप्रमाणे पितृदोषांत घरातील आधी पुरुष हे स्वतःची जबाबदारी एकतर नीट पाळत नाहीत असे नसेल तर ते आधी निघून जातात मग जास्तीत जास्त अशा घराण्यात स्त्रिया मागे राहिलेल्या पहिल्या जातात.

१४) जास्तीत जास्त मॅरीड लाईफ पूर्ण ना होणे जसे एखादि वैवाहिक जीवनातील डिवोर्स आणि कोर्ट केसेस ची घटना सुद्धा.

१५) पितृदोष असेल तर घराण्यात नेहमी असे पहिले गेलेले आहे कि घर जमीन आणि प्रॉपर्टी बनवताना अति त्रास होत असतो असे नसेल तर मग ते बनविल्यास एका वर्षात जो त्रास सुरु झालेला असतो कि ज्याने हैराण होतात त्या प्रॉपर्टीज मुळे किंवा इतर कारणाने (हे एका वर्षासाठी समजावे ह्यात घरातील एखादी दुर्घटना सुद्धा पाहण्यात येते किंवा मोठे आजार होताना दिसतात).

१६) घराण्यात जर वय वर्षे ३० च्या नंतरच सर्वांची लग्ने होणे जास्तीत जास्त ३३/३६ नंतरच मुलं होणे.

१७) घराण्यात कॅपॅसिटी असताना सुद्धा कुणालाही करिअर करताना जास्त त्रास होणे हे सुद्धा पितृदोषाचे लक्षण आहे.

१८) एखादी प्रॉपर्टीज वरून घराण्यात भावा भावा मधील वाद.

१९) कोणत्याही कोर्ट केस ला अचानक सामोरे जावे लागत असेल तर.

२०) कुटुंबात कुणी नशा करून आपले आयुष्य उध्वस्त करून घेत असेल तर.

२१) घरात अपंग व्यक्ती किंवा बरीच वर्षे आजाराने पीडित व्यक्ती अंथरुणात असेल तर.

२२) एखाद्या व्यक्तीला आपल्या पितरांकडून कोणतीच मदत नसेल किंवा मिळाली जरी असेल तर त्यात डेव्हलोपमेंट करता आली नसेल. जसे वडिलांनी बँकेत ठेवलेली रक्कम किंवा त्यांचे घर ह्यात काहीच पुढे नेता आले नाही आणि उपयोगी सुद्धा पडले नाही.
किंवा वडिलांनी मुलाच्या शिक्षणासाठी खर्च केलेला पैसा हा मुलाला त्याच्या करिअर मध्ये उपयोगी पडला नाही किंवा वडिलांनी मुलासाठी विवाह मध्ये खर्च केलेला पॆसा मुलाचा सुखी संसार होताना दिसत नसेल तर अशा कोणत्याही पितरांची मदत तेथे कामी येत नाही घराण्यात पितृदोष असेल तर ह्यावर जरूर विचार व्हावा.

महत्वाचा पॉईंट
घराण्यात चेक केल्यानंतर नेहमी त्या गोष्टी चैन सिस्टिम्स ने पुढील पिढीत मिळतच असतात पण हे सर्व त्याच्या स्वतःच्या पत्रिकेवर असते येथे राहू केतू शनी मंगळ आणि महत्वाचा ग्रह सूर्य हा चेक केला जातो कि किती प्रमाणात हा दोष आपल्याला ग्रसित करेल.

तुमचे मत —–जर असे असेल कि वरील सर्व समस्यांमधील एक ना एक समस्या सर्व मानव जातीला असतीलच तर मग पितरांचा काय रोल आहे ह्यात?

माझे मत — ह्यावर अधिक विचार आणि अभ्यासांती असे लक्षात आले कि प्रत्येक आपल्या प्रॉफिट मध्ये पितरांचे सहकार्य हे ३५% असतेच. आपल्या मेहनतीचे फळ हे ३५% च असते. ६५% कुठे आहेत? अधिक जाणून घेण्यासाठी खालील गोष्टींवर जरूर विचार व्हावा.

उदाहरण क्रमांक १

पैसे कामविण्या साठी सर्व जण कामावर सकाळी ९ वाजता जातात आणि आपले टार्गेट १०० रुपये कमावून आणण्याचे आहे आणि त्यात जवळ जवळ सर्वांची मेहनत करण्याची तयारी सुद्धा सारखी आहे असे समजा.
तर कोणत्या लेवल ला पितृदोष काम करेल ते समजून घ्या .

१) कोण दुपारीच १०० रुपये घेऊन येईल १२ पर्यंत
२) कोण संध्याकाळी ७ वाजेपर्यंत १०० रुपये घेऊन येईल
३) कोण रात्री ११ वाजता घरी १०० रुपये घेऊन येईल.
४) आणि त्यात जो दळिद्री असेल तो ११ वाजता किंवा संध्याकाळी ७ वाजता जरी १०० रुपये मिळाले तरी तो घरी घेऊन येणार नाही एकतर तो जुगार खेळेल किंवा दारू पिऊन येईल त्या मिळालेल्या पैशाने.

उदाहरण क्रमांक २

समाजात कित्येक जण असे आहेत कि काहीही शिक्षण नसताना एखाद्या इंजिनिअर , ग्रॅज्युएट , अति उच्च शिक्षण घेतलेल्या व्यक्तीपेक्षा जास्त कमवितात.

उदाहरण क्रमांक ३
समाजात किती तरी अशा व्यक्ती पाहायला मिळतात कि गरजेपेक्षा कितीतरी कमी मिळकत असून सुद्धा ते आपल्या संसारात सर्व बाजूनी सुखी आहेत. मुलं बाळ घर संसार फुललेला आहे त्यांचा.

उदाहरण क्रमांक ४

कितीतरी स्पर्धा परीक्षांमध्ये मुलं हि पहिल्या ३ मध्ये येतात त्या तिघांनी सारखी मेहनत केलेली असते पण एकालाच पहिला येण्याचा मान मिळतो. मग दुसऱ्या आणि तिसऱ्याने काय घोडे मारले होते. ह्यालाच DNA ची ताकद म्हणतात जी पूर्वजांकडून येत असते.

म्हणजे आपल्या १०० रुपयातील ३५ रुपये हे पितरांमुळे
३५ रुपये आपल्या फक्त मेहतीने असावेत
१० रुपये आपल्या ह्या जन्मी च्या भाग्या चे असावेत
१० रुपये हे आपल्या मागच्या जन्माच्या पुण्याचे फळ असावे
१० रुपये हे आपल्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींच्या नशिबाने आपल्या पदरात पडत असतात. म्हणून काही मुले जन्माला आली कि बाप श्रीमंत होतात कारण सोन्याचा चमच्याने दूध पिण्याचा योग घेऊन आलेली असतात.
३५+३५+१०+१०+१० = १००
वरील विषय हा आपल्या जीवतातील प्रत्येक टार्गेट साठी साठी पितरांच्या आशीर्वादासाठी समजावा ३५ % नाहीतर नेहमी ६५% वर राहावे लागते व्यक्तीला. त्यात जर भाग्य स्थानाचे , मागच्या जन्माचे १०/१०% वजा झाले तर अजून डाऊन असतो असा एखादा व्यक्ती आपल्या जीवनात.

धन्यवाद…..!

This Post Has One Comment

  1. Jayashri Nalawade

    This information is very best

Leave a Reply