पितृदोष पत्रिकेत स्वतः चेक करा
पितृदोष – पितृदोषाचे काही ज्योतिष योग येथे देण्याचा प्रयत्न करतो पण त्या अगोदर पितृदोषाची थोडी व्याख्या.
पितृ ह्या शब्दाचा प्रयोग त्याच्यासाठी आहे ज्या वंशात आपण जन्म घेतला आहे. ज्यांचे सेल हे आपल्या रक्तात आहेत. असे पितर ज्यांचा मृत्यू होऊन ते पितृ योनीत आहेत. आणि दोष ह्याचा अर्थ आपल्या हातून त्यांच्या सेवेत झालेल्या त्रुटी.
जसे जसे वय वाढत जाते तसे तसे त्या वेळी प्रत्येकाला ह्याची जाणीव होतेच काही जण लक्ष देतात आणि काही जण दुर्लक्ष करतात. दुर्लक्षित होणारा भाग म्हणजे पितृदोष होय.
पण हा दोष लगेच पत्रिकेत पाहायचा असेल तर खालील काही योग आणि पत्रिका येथे देत आहे.
तुम्हाला सहज समजणारे योग.
- लग्न कुंडलीत कोणत्याही स्थानी रवी बरोबर राहू किंवा राहू बरोबर चंद्र लिहिला असेल कोणत्याही स्थानी तर:- ग्रहण दोष
- लग्न कुंडलीत कोणत्याही स्थानी राहू बरोबर मंगळ तर:- अंगारक दोष
- लग्न कुंडलीत कोणत्याही स्थानी राहू बरोबर शनी तर:- प्रेतशाप योग
- लग्न कुंडलीत कोणत्याही स्थानी राहू बरोबर गुरु तर:- चांडाळ दोष
- लग्न कुंडलीत कोणत्याही स्थानी शनी बरोबर रवी:- पितृदोष
- लग्न कुंडलीत कोणत्याही स्थानी शनी बरोबर चंद्र :- विषयोंग
- लग्न कुंडलीत कोणत्याही स्थानी शनी बरोबर मंगळ:- पितृदोष
- लग्न कुंडलीत कोणत्याही स्थानी रवी चंद्र :- अमावस्या योग
हे योग पत्रिकेत पाहून समजू शकतो कि आपल्या घराण्यात पितृदोष आहेत. ते कमी किंवा जास्त हे त्या त्या स्थानावरून ठरविले जाते.
काही योग इथे देतो ते आपल्याला ज्योतिषांकडून कन्फर्म करून घ्यायचे असतात.
सूर्य ६/८/१२ स्थानात असणे म्हणजे पितृदोष असू शकतो.
सातव्या स्थानी राहू शत्रू राशीत असणे म्हणजे पितृदोष असू शकतो.
रवी तूळ राशीत म्हणजे ७ आकड्याबरोबर लिहिला असेल तर १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर ह्यात जन्म झालेला असतो.
अशा वेळी पत्रिकेत रवी नीच राशीत असतो. पण ह्यात पूर्ण वर्षात ह्या एका महिन्यात करोडो घराण्यात मुले जन्म घेत असतील तरी अशा सर्व पत्रिकां मध्ये ८०% पितृदोष असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पत्रिकेत ज्या स्थानी हि राशी असेल त्या स्थानातून पितर म्हणजे मागील घराणी हि हैराण असतात.
कुटुंब स्थानी , नवम स्थानी , पंचम स्थानी कोणताही पापग्रह (रवी , शनी , मंगळ , राहू , केतू ) असणे म्हणजे पितृदोष कन्फर्म.
काही पत्रिका देत आहे तश्याच पत्रिका आपल्या आहेत का ते चेक करूनपितृदोषाबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढेल.
धन्यवाद…..!
Very best 👌👌 information