Table of Contents
बलिप्रतिपदा
बलिप्रतिपदा- असुरांचा राजा बलि हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षसकुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, राजा म्हणून बलिराजाची ओळख होती.बलि राजा हा फार दानशूर होता. त्यामुळे त्याचे पुण्य वाढून तो अधिक ताकदवान झाला. पृथ्वीवर देवांपेक्षा त्याचे जास्त महत्व वाढू लागले.
ह्याच धीरामुळे त्याने स्वर्गावर अधिपत्य मिळविण्यासाठी यज्ञाचे आयोजन केले. इंद्रासहित सर्व देवगण भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांनी हा यज्ञ पूर्ण न होण्यासाठी काही तरी करा अशी प्रार्थना केली.
तेव्हा विष्णूंनी एका लहान भिक्षुक ब्राह्मण बालकाचे स्वरूप घेतले हाच तो वामन अवतार आणि जिथे बलि राजाचा यज्ञ सुरु होता तेथे वामन अवतारात प्रकट झाले. बलि राजा हा खूप दानी आहे हे ते जाणून होते म्हणून त्यांनी बलि राजाकडे ३ पावले भूमी मला दे मग यज्ञाला सुरुवात कर.
तेथे शुक्राचार्य सुद्धा होते त्यांनी बलि राजाला सावध सुद्धा केले तरी बलि राजा म्हणाला कि जर स्वतः विष्णू जरी माझ्या दारी आले तरी मी त्याना माघारी पाठवू शकत नाही असे म्हणून त्यांनी वामनाला ३ पावले जमीन देण्याचे मान्य केले.
लागलीच वामनरूपी विष्णूंनी विराट रूप धारण केले त्यांच्या एका पावलात स्वर्ग आणि आकाशमंडळ सामावून गेला दुसरे पाऊल पृथ्वीवर ठेवले आणि आता तिसरे पाऊल ठेवण्यास त्यांना जागा नव्हती म्हणून त्यांनी बलि ला विचारले कि तिसऱ्या पावलांसाठी मला जागा दे लागलीच बलि राजा म्हणाले कि भगवंत हे पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा.
मग तसेच त्यांनी तिसरे पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवला आणि बलि राजाचा अंत झाला. त्या आधी बलि राजाने विष्णूकडे पृथ्वीवरील तीन दिवस मागून घेतले ज्यात प्रत्येक वर्षी त्याच्या ह्या त्यागाची लोक आठवण करतात. तेव्हापासून बलिप्रतिपदा हा उत्सव बलि राजाला समर्पित आहे.
बलिप्रतिपदेच्या दिवशी काय करावे ?
‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दीपोत्सवही केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून हा दिवस साजरा केला जातो. त्यामुळे व्यापाऱ्यांसाठी हा दिवस खास असतो आपल्या नवीन वह्यांची सुरुवात ह्या दिवशी सुद्धा केली जाते. नवीन जागेचे दुकानाचे उदघाटन ह्या दिवशी शुभ मानले जाते.
दीपावली पाडवा
बलिप्रतिपदा ह्या दिवशी घरोघरी पत्नी पतीला ओवाळणी करण्याची पद्धती आहे. त्यासाठी पाटाभोवती सुंदर रांगोळी काढून पतीला बसवून पत्नी पतीची ओवाळणी करते त्याबदल्यात पती पत्नीला आपल्या ऐपतीप्रमाणे काहीतरी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे.
नवविवाहित जोडपी पहिली दिवाळी आपल्या माहेरी साजरी करतात. त्यात जावयाला तेथे आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे भेटवस्तू देण्याची परंपरा आहे.
धन्यवाद…..!
श्री दत्तगुरु ज्योतिष
shreedattagurujyotish.com
9821817768
7506737519