भिन्नाष्टक वर्गात वैवाहिक सुखाचा दर्जा- शुक्र हा वैवाहिक सुखाचा कारक आहे आणि म्हणून आपले वैवाहिक सुखाचा दर्जा पाहण्यासाठी शुक्र आणि शुक्राच्या भिन्नाष्टक वर्गाचा इथे विचार करण्यात येतो. आपल्याला जोडीदाराबद्दल चे आकर्षण कसे असेल आपला जोडीदार कोणत्या दिशेचा निवडावा आणि इतर बाबी सुद्धा ह्या शुक्राच्या भिन्नाष्टक वरून खालील नियम देऊन समजविण्याचा प्रयत्न केला आहे. विवाहाच्या अगोदर जर हे आधीच समजले तर त्यावर आपल्याला आपण जोडीदाराबरोबर कसे राहावे हे समजण्यात मदत होते.
Table of Contents
भिन्नाष्टक वर्गात वैवाहिक सुखाचा दर्जा- नियम क्रमांक १
- शुक्र ज्या राशीत असतो त्या राशीचा स्वामी
- शुक्र कोणत्या राशीत आहे पहा
- शुक्र गुरु च्या ९- धनु राशीत राशीत आहे
- शुक्र चा राशी स्वामी गुरु झाला.
- आता गुरु ला त्याच्या भिन्नाष्टक मध्ये किती बिंदू आहेत ते पाहू
- गुरु ८ वृश्चिक राशीत आहे
- गुरु च्या भिन्नाष्टक वर्ग मध्ये ८ च्या खाली ५ बिंदू मिळाले आहेत
- ५ आणि त्यापेक्षा जास्त आहेत म्हणून उत्तम विवाह सुख मिळेल.
- सर्वांच्या कुंडलीत गुरुचे एकूण गुण ५२ असतात जर १२ ने भाग दिला कारण भाव १२ म्हणून ४ पेक्षा जास्त येतात म्हणून येथे 4 पेक्षा जास्त गुण हवे आहेत. उत्तम विवाह सुखासाठी. खूप कमी असतील तर जास्त नुकसान होईल.
हेही वाचा : अष्टकवर्गाने दिवसाचे कोणते तास आपल्यासाठी लकी?
नियम क्रमांक २
शुक्रापासून सातव्या घरात जन्मनक्षत्र स्वामी ने किती बिंदू दिले आहेत ते सुद्धा पाहावे. ह्या कुंडलीत ह्या व्यक्तीचे रेवती नक्षत्र आहे. रेवती हे बुधाचे नक्षत्र आहे. नक्षत्र स्वामी बुध झाला.
शुक्र च्या ७ व्या भावावरून लाईफ पार्टनर पाहतात आणि शुक्र च्या ५ व्या स्थानावरून प्रेमातला पार्टनर पाहतात. किंवा विरुद्ध लिंगी आकर्षण पाहतात. जर नक्षत्र स्वामी ने जर शुक्र च्या ७ व्या स्थानात चांगले बिंदू दिले तर लाईफ पार्टनर बद्दल आकर्षण असते किंवा त्याच्याकडून जे मिळणारे असते ते सुख खूप छान असते. (शारीरिक मानसिक दोन्ही).
पण इथे जर ७ व्या स्थानात नक्षत्र स्वामी ने जर कमी बिंदू दिले आणि ५ व्या स्थानात जास्त दिले तर असे हि म्हणता येईल कि ह्या व्यक्तीला आपल्या पार्टनर पेक्षा इतर व्यक्तीकडून कोणतेही सुख चांगले असू शकेल जे विरुद्ध लिंगी बरोबर असते.(आकर्षण).
वरील शुक्राच्या भिन्नाष्टक वर्गात शुक्राच्या ७ व्या स्थानी मिथुन बुधाची राशी येत आहे. आणि तेथे जन्मनक्षत्र स्वामी बुध किती बिंदू देत आहे हे पाहू. शुक्राच्या भिन्नाष्टक मध्ये मिथुन राशीत बुध ० गुण देत आहेत.
आणि शुक्रापासून च्या ५ व्या स्थानात मंगळाची १ नंबर मेष राशी आहे म्हणून शुक्राच्या भिन्नाष्टक मध्ये १ नंबर खाली बुधाने १ गुण दिले आहेत. ह्याचा अर्थ ह्या व्यक्तीला त्याच्या लाईफ पार्टनर बरोबर आकर्षण कमी असेल. मात्र इतरांकडून त्यास ते आकर्षण मिळू शकेल.
मात्र हे जोडीदाराच्या पत्रिकेत सुद्धा पाहून कन्फर्म करायला हवे जर तिथे ह्या नियमाने बिंदू चांगले असतील तर मात्र विवाह चांगला चालू शकतो. कारण समोरील पार्टनर ला त्याच्या लाइफपार्टनर बरोबर आकर्षण असेल तर काही जास्त समस्या जाणवणार नाही.
नियम क्रमांक १ मध्ये जे गुरु च्या भिन्नाष्टक मध्ये ५ गुण जास्त आहेत त्यामुळे संसारात जास्त प्रॉब्लेम्स येणार नाहीत.
जर तिथे सुद्धा जास्त बिंदू नसते तर इथे शुक्रापासून ५ व्या स्थानाचा १ बिंदू काम करून गेला असता जो वाईट असता.
नियम क्रमांक ३ – कोणत्या दिशेपासून जीवनसाथी नको.
शुक्र च्या भिन्नाष्टक वर्गात सर्वात कमी गुण कुठे आहे ते पहा आणि जास्त गुण कुठे आहेत ते पहा.
इथे जर कमी गुण जिथे असतील त्या दिशेकडून जर जीवनसाथी मिळाला तर खूप त्रास होऊ शकतो.
दिशा पाहण्यासाठी खालील नियम आहेत.
- १/५/९ मेष सिंह धनु राशी ह्या पूर्व दिशेच्या आहेत
- २/६/१० ऋषभ कन्या मकर राशी ह्या दक्षिण दिशेच्या आहेत
- ३/७/११ मिथुन तुला कुंभ राशी पश्चिम दिशेचा आहेत
- ४/८/१२ कर्क वृश्चिक मीन ह्या राशी उत्तर दिशेच्या आहेत
आता प्रत्येक राशीचे एकूण गुण काढू-
इथे शुक्राच्या भिन्नाष्टक वर्गात १/५/९ राशी चे मिळून गुण ४+५+३=१२ –पूर्व ( जे गोल गोल केले आहेत ते भिन्नाष्टक बिंदू मानावेत)
- २/६/१० राशी जिथे आहेत तिथे पहा ३+५+४ = १२ दक्षिण
- ३/७/११ राशी जिथे आहेत तिथे पहा ४+६+५ = १५ पश्चिम
- ४/८/१२ राशी जिथे आहेत तिचे पहा ६+२+५ = १३ उत्तर
ह्यात असे पाहतात कि जर जास्त गुण जिथे असतील ती पश्चिम दिशा निवडावी.
शुक्राचे एकूण ५२ गुण असतात त्यास ४ दिशा म्हणून भाग दिला तर ५२/४ = १३
म्हणून इथे असाही विचार करण्यास हरकत नाही कि जर १३ पेक्षा खूप जास्त पॉईंट मिळत असतील तर नक्कीच त्या दिशेला विवाह करू नये. इथे १२ पूर्व आणि दक्षिण १३ उत्तर दिशा सुद्धा घेण्यास हरकत नाही पण खूप कमी गुण एखाद्या दिशेला मिळत असतील तर ती घेऊच नये.
नियम ४
६,८,१२ ह्या तीन भावात जर वैवाहिक कारक शुक्र असेल आणि तिथे ३ आणि तीन पेक्षा कमी गुण मिळत असतील तर वैवाहिक सुखात काहीतरी त्रास नक्की होत असतो. आनंदी वैवाहिक सुख सांगता येत नाही. काहीतरी कमी पण असू शकते.
आपण वरील चारही नियम लावून स्वतः आपल्या वैवाहिक सुखाची टक्केवारी काढू शकता. जर चारही नियम सपोर्ट करत नसेल तर विवाह करताना नक्कीच काळजी घ्यावी. आणि हे जर समजत नसेल तर ज्या ज्योतिषांना भिन्नाष्टक चे ज्ञान असेल अशा ठिकाणी आपली कुंडली दाखवावी कारण हे जेव्हढे काढणे कठीण दिसते तेव्हढेच त्याचा रिझल्ट हा १००% मिळतो.
धन्यवाद…..!