You are currently viewing पंचक ची संपूर्ण माहिती I ALL ABOUT PANCHAK

काय आहे पंचक?

२७ नक्षत्रांमधून चंद्राचे भ्रमण सतत सुरु असते. साधारण एका दिवसाला एक नक्षत्रातून चंद्र पुढे पुढे जात असतो म्हणून चंद्राला २७ नक्षत्र पार करण्यास २७ दिवस लागतात. जेव्हा चंद्र शेवटच्या ५ नक्षत्रातून भ्रमण करीत असतो तेव्हा पंचक लागले असे म्हणतात. त्या नक्षत्रांची नावे पुढील प्रमाणे (धनिष्ठा, शतभिषा-(शततारका) , पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती) हे ५ दिवस म्हणून ह्याला पंचक म्हटले आहे आणि हा काळ अति अशुभ मानलेला आहे.

धनिष्ठा नक्षत्राची पहिली २ नक्षत्रे गेल्यावर ३ ऱ्या चरणाला पंचक सुरु होते. पंचक जेव्हा सुरु होते तेव्हा चंद्र हा कुंभ आणि मीन राशीत असतो.

  • रविवारी सुरु होणारा पंचक रोग पंचक असतो ह्यात सुरु केलेले कोणतेही शुभ काम मानसिक आणि शारीरिक पीडा देऊ शकतील
  • सोमवारी सुरु होणारा पंचक हा राजपंचक असेल हा शुभ मनाला जातो ह्या ५ दिवसात सरकारी कामात सफलता मिळते. राजपंचक संपत्ती च्या कामात शुभ फळे देऊ शकतील.
  • मंगळवारी सुरु होणारा पंचक हा अग्नी पंचक असेल ह्या ५ दिवसात कोर्ट कचेरी च्या बाबतीतील किंवा आपले कोणतेही हक्क मिळविण्यासाठी केलेले कोणतेही काम चांगले परिणाम देतात. मात्र ह्यात अग्नी चे भय असते कोणतेही मशीनरी कामे, अवजार, यंत्रे , निर्माण काम संबंधित कामे करू नयेत. किंवा घरात ज्वलनशील वस्तू सुद्धा आणू नये आग लागण्याची भीती असते.
  • शनिवारी सुरु होणारा पंचक मृत्यू पंचक म्हणून मानला जातो म्हणून ह्या ५ दिवसात अति साहसाचे काम करू नये मृत्यू चे भय निर्माण होऊ शकते किंवा वादविवाद, अपघात होण्याचे संभव नाकारता येत नाही.
  • शुक्रवारी सुरु होणारा पंचक चोर पंचक म्हणून ओळखला जातो म्हणून ह्यात यात्रा टाळणे उत्तम. देणं घेणं संबंधित व्यापार ह्यात व्यवहार करू नये धन हानी होण्याचा संभव असतो.
  • बुधवार आणि गुरुवार जर पंचक सुरु होत असेल तर वरील नियमाचे पालन करू नये

पंचक मधील हि ५ कामे अजिबात करू नये

१) पलंग बनवू नये किंवा विकत आणू नये
२) पंचक मध्ये धनिष्ठा नक्षत्र असेल तेव्हा घास लाकूड एकत्र जमा करू नये अग्नी भय होते.
३) पंचक मध्ये दक्षिण दिशेची यात्रा करू नये
४) पंचक मध्ये रेवती नक्षत्रात घरावर छप्पर टाकू नये किंवा त्याचे काम करू नये ह्याने घरात वाद निर्माण होतात किंवा धन हानी होते.
५) पंचक मध्ये मृत व्यक्ती चे अंतिम संस्कार करताना विशेष काळजी घ्यावी. त्याशिवाय अंतिम संस्कार करू नये.

पंचक मधील अंतिम संस्कार

एखाद्या कुटुंबात जर कुणाचा मृत्यू पंचक मध्ये झाला असेल तर त्यास पंचक लागला असे आपण मानतो. पुराणाच्या मान्यतेनुसार अशा व्यक्ती च्या घराण्यात किंवा जिथे वास्तव्यास असेल तेथील अजून ४ व्यक्ती ज्याण्याचा (मृत होण्याचा) संभव असतो ज्याने ती संख्या ५ होते. ह्यासाठी जेव्हा अशा व्यक्ती मृत पावल्यानंतर त्यांचे प्रेत घरात अधिक काळ ठेवू नये. घराबाहेर ठेऊन अंतिम यात्रेच्या आधीची विधी पार पाडावी.

अशा व्यक्तीच्या अंतिम संस्काराच्या वेळी ५ पिंडांचा सुद्धा विधिवत संस्कार करून त्यांचा सुद्धा अंतिम संस्कार करावा लागतो.
काही ठिकाणी जव आणि तांदळाच्या पिठाचे मिश्रण करून पुतळे बनविले जातात आणि त्यांना सुद्धा दाह संस्कार दिला जातो.
काही ठिकाणी हेच पुतळे कुशा चे सुद्धा बनविले जातात.

अंतिम संस्काराच्या वेळी हे जमले नाही तर त्या व्यक्ती च्या कार्या वेळी ५ पिंडाचे मुक्ती संस्कार पार पाडावे लागतात.हे काम योग्य कर्मकांड करणाऱ्या व्यक्तीकडून करून घ्यावे.

पंचक मधील काही शुभ कामे

पंचक मध्ये धनिष्ठा आणि शतभिषा नक्षत्र हि चल संज्ञक मानली जातात त्यामुळे यात्रा, वाहन खरेदी, मशिनरी संबंधित कामे शुभ मानली जातात.

उत्तर भाद्रपदा नक्षत्र स्थिर संज्ञक नक्षत्र आहे ह्यात पेरणी, गृह प्रवेश, शांती पूजन, जमिनीशी संबंधित स्थिर कार्ये करू शकतात.
रेवती नक्षत्र हे मैत्री संज्ञक नक्षत्र आहे ह्यात कपडे, व्यापार संबंधित व्यवहार, कोणतेही विवाद संपविण्याची कामे, सोने खरेदी हि कामे करणे शुभ मानले आहे.

२०२१ चे प्रत्येक महिन्याचे पंचक कोष्टक खाली दिले आहे

  • १५ जानेवारी ते २० जानेवारी २०२१
  • १२ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२१
  • ११ मार्च ते १६ मार्च २०२१
  • ७ एप्रिल ते १२ एप्रिल २०२१
  • ४ मे सकाळी ८:४४ ते ९ मे संध्याकाळी ५:२९ पर्यंत
  • १ जून पहाटे ३:५९ ते ५ जून रात्री ११:२८ पर्यंत
  • २८ जून दुपारी १ ते ३ जुलै संध्याकाळी ६:१४ पर्यंत
  • २५ जुलै रात्री १०:४८ ते ३० जुलै दुपारी २:०३ पर्यंत
  • २२ ऑगस्ट संध्याकाळी ७:५७ ते २६ ऑगस्ट १०:२९ पर्यंत
  • १८ सप्टेंबर दुपारी ३:२६ ते २३ सप्टेंबर सांधायकली ६:४४ पर्यंत
  • १५ ऑक्टोबर संध्याकाळी ९:१९ ते २० ऑक्टोबर दुपारी २:०२ पर्यंत
  • १२ नोव्हेंबर २:५२ ते १६ नोव्हेंबर रात्री ८:१५ पर्यंत
  • ९ डिसेंबर रात्री १०:१० ते १४ डिसेंबर दुपारी २:०५ पर्यंत

पंचक पाहण्यासाठी आपल्या मोबाइल मध्ये प्ले स्टोर ला जाऊन कोणतेही पंचांग ऍप्स डाउनलोड करून प्रत्येक दिवसाला नक्षत्र कोणते आहे किती वाजता सुरु होईल आपल्या विभागाप्रमाणे पाहू शकता.

धन्यवाद…..!

Leave a Reply