अक्षय तृतीया पौराणिक महत्व
वैशाख शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या तिथीला अक्षय तृतीया असते भारतीय कालगणनेनुसार वैशाख शुक्ल तृतीया ला त्रेतायुगाचा शुभारंभ झाला. त्यामुळे ह्या तिथीला युगादी तिथी सुद्धा म्हणतात. अशी मान्यता आहे कि ह्या तिथीवर तीर्थक्षेत्री , पवित्र नदी किनारी स्नान दान केल्याने सहस्त्र गायी दान केल्याचे पुण्य पदरात पडते. ( Akshay Tritiya Importance in marathi )
अक्षय ह्याचा अर्थ कधीही ज्याचा क्षय होत नाही. म्हणून ह्या दिवशी केलेले कोणत्याही चांगल्या कामाचा क्षय होत नाही. ह्या दिवशी आई रेणुकाच्या गर्भातून विष्णू अवतार परशुराम यांनी जन्म घेतला आणि ते चिरंजीवी झाले. ह्या दिवशी आई पार्वती अन्नपूर्णा रूपात अवतरित झाली होती आणि भगवान शिवाने तिच्याकडून भिक्षा प्राप्त केली.
वैशाखात सूर्याचा ताप असल्यामुळे ह्या वातावरणात जल, कलश , तांदूळ, दूध, दही इत्यादी शीतल पदार्थ आणि त्याबरोबर वस्त्र (कपडे) दान केल्याने व्यक्तीला पुण्य मिळते. ह्या दिवशी सुवर्ण खरेदी केल्याने सौभाग्य मिळते अशी परंपरा आहे. आणि ह्या दिवशी खरेदी केलेले सोने हे कधीही त्याचा ऱ्हास होत नाही.
ह्या दिवशी जेव्हढे आपल्या हातून चांगले कर्म होईल त्याचे पुण्य मिळते आणि व्यक्तीला पुण्य प्राप्ती होते.
अक्षय तृतीया शुभ मुहूर्त (AKSHAY TRITIYA SHUBH MUHURT)
- तृतीया तिथि प्रारम्भ: 14 मे 2021, शुक्रवार, 05 वाजून 38 मिनिटांपासून
- तृतीया तिथि समाप्त: 15 मे 2021, शनिवारी 07 वाजून 59 मिनिटापर्यंत.
- अक्षय तृतीया शुभ मुहूर्त: 14 मे 2021 सकाळी 05 वाजून 38 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 18 मिनट मिनिटापर्यंत
- सुवर्ण खरेदी शुभ मुहूर्त: 14 मे 2021 सकाळी 05 वाजून 38 मिनिटांपासून 15 मे 2021 सकाळी 05 वाजून 30 मिनिटापर्यंत.
विशेष नोट — आता सध्याच्या परिस्थितीत मागील काही दिवसापासून कोविड मुळे समाज हैराण झाला आहे त्यात जर उद्या काही करायचे असेल तर नक्की ह्या अक्षय तृतीया चा दिवस दान करण्यास किंवा कुणाला कसलीही एकदम छोटीत छोटी तरी मदत करण्यास उत्तम दिवस आहे ज्याने आपल्याला नक्की ह्याचे पुण्य पदरात पडेल.
धन्यवाद…..!