Table of Contents
शकट योग
लग्न कुंडलीत चंद्र जिथे लिहिला आहे त्या चंद्रापासून मोजले असता गुरु ६/८/१२ व्या स्थानी असेल तर शकट योग निर्माण होतो.
हा योग असला तर तो भंग कसा होईल?
चंद्र पासून गुरु ६/८/१२ स्थानी असला तर हा योग होतो पण जर गुरु लग्न स्थानाला पाहत असेल, लग्न स्थानापासून शुभ भावात असेल किंवा जर गुरु केंद्र स्थानी असेल तर हा दोष थोडासा भंग होईल. त्रास कमी होतील.
शकट योग झाला आणि जर चंद्र मजबूत स्थितीत असेल तर ह्यात सुद्धा शकट योगाचे दुष्परिणाम कमी होतात.
- चंद्र आणि गुरु ह्या दोघांच्या डिग्रीत जर १५ पेक्षा जास्त डिग्री असतील तर हा योग भंग होतो.
- गुरु जर आत्माकारक ग्रहाला आपल्या ५/७/९ व्या दृष्टीने पाहत असेल तर हा दोष भंग होतो.
- कुंडलीत चंद्रादि योग असेल म्हणजे चंद्रापासून ६/७/८ व्या स्थानी एक एक शुभ ग्रह असता ह्या योगाचा भंग होतो.
चंद्र सुस्थितीत आणि बलवान असेल तर ह्या योगात होणाऱ्या कष्टापासून व्यक्ती सामना करण्यास मजबूत असतो.
पण ह्यातली कोणतीच स्थिती नसेल तर मात्र शकट योग खालील गोष्टी आपल्या जीवनात घडवू शकेल.
दुष्परिणाम शकट योगाचे
शकट ह्याचा अर्थ एक चलायमान गाडीचे चाक जे सतत वर खाली होत असते. ह्यावरून असे मानावे लागते कि हा योग ज्याच्या पत्रिकेत असतो जीवनात स्थिरता मिळविण्यासाठी सतत त्याला धडपड करावी लागते. काही वेळा एकदम व्यक्ती आपल्या जीवनात वर जाऊन खालच्या थराला येऊन जातो. तेव्हा हा योग जास्त घातक परिणाम देत आहे असे म्हणावे लागते. आर्थिक दृष्ट्या हा दोष चांगली परिस्थिती देत नाही. व्यक्ती कितीही मोठ्या घराण्यात जन्म घेतला तरी ह्यात व्यक्तीला आर्थिक त्रास होण्याचा संभव असतो.
आपल्या पत्रिकेत हा योग म्हणजे चंद्र पासून गुरु ६/८/१२ व्या स्थानी लिहिला असला जरी तो भंग होत असला तरी कृपया ह्यातील दशा महादशा आल्यावर योग्य ज्योतिषांचा सल्ला घ्यावा.
धन्यवाद…..!