अष्टकवर्ग सूर्य भिन्नाष्टक आणि आपली भाग्योदयक दिशा– YOUR LUCKY DIRECTION BY ASTHAKVARG
जर आपल्याला आपली भाग्योदय दिशा जाणून घ्यायची असेल तर अष्टक वर्गाच्या कुंडलीत रवी भिन्नष्ठक कुंडली आपल्याला मदत करू शकेल. वरील कुंडली हि सूर्याची भिन्नाष्टक कुंडली आहे. आपल्याकडे हि कॉम्पुटर कुंडली मध्ये असेलच. त्यात सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनी आणि लग्न असे मिळून एकाच पानावर ८ कुंडल्या वेगवेगळ्या भिन्नाष्टक वर्गाच्या असतील त्यातील पहिली कुंडली हि सूर्य भिन्नाष्टक वर्गाची असते. जी खाली दिल्याप्रमाणे असेल. मी ज्यांना ज्यांना पीडीएफ रिपोर्ट दिला आहे त्या सर्वांकडे ह्या कुंडल्या असतीलच. ज्यांच्याकडे नाहीत त्यांनी कोणत्याही फ्री कुंडली सॉफ्टवेअर ची मदत घेऊ शकता.
हेही वाचा :- कमी मेहनत आणि जास्त फायदा I समाधानी करिअर ची निवड
त्यात खाली दिलेले सोपे नियम लावून सहज समजून घ्या कि आपल्यासाठी लकी दिशा कोणती.
- सर्वांसाठी त्याच्या अष्टकवर्ग कुंडलीत १/५/९ क्रमांकाच्या राशी जिथे लिहिल्या असतील त्या पूर्व दिशा समजाव्यात.
- सर्वांसाठी त्याच्या अष्टकवर्ग कुंडलीत २/६/१० क्रमांकाच्या राशी जिथे लिहिल्या असतील त्या दक्षिण दिशा समजाव्यात.
- सर्वांसाठी त्याच्या अष्टकवर्ग कुंडलीत ३/७/११ क्रमांकाच्या राशी जिथे लिहिल्या असतील त्या पश्चिम दिशा समजाव्यात.
- सर्वांसाठी त्याच्या अष्टकवर्ग कुंडलीत ४/८/१२ क्रमांकाच्या राशी जिथे लिहिल्या असतील त्या उत्तर दिशा समजाव्यात.
- १/५/९ ह्या राशी जिथे असतील तिथे सूर्य चे भिन्नाष्ठक वर्ग चे गुण लिहा आणि त्याला प्लस करा
- २/६/१० नंतर ३/७/१० नंतर ४/८/१२ चे सुद्धा लिहा जिथे सर्वात जास्त पॉईंट्स मिळतील ती दिशा शुभ असेल प्रगती करण्यासाठी.
समजा वरील कुंडलीत १ नंबरच्या मेष राशीत – ३
५ नंबरच्या सिंह राशीत -५ आणि
९ नंबरच्या धनु राशीत -५
=३+५+५ = १३ गुण
असेच २/६/१० ह्या राशीत मिळून सूर्य ७+५+२ = एकूण १४ गुण देत आहे.
३/७/११ ह्या राशीत मिळून सूर्य ४+३+४= एकूण ११ गुण देत आहे
४/८/१२ ह्या राशीत मिळून सूर्य २+५+३ – एकूण १० गुण देत आहे.
वर दिलेल्या गुंणांमध्ये सर्वात जास्त गुण सूर्य २/६/१० ह्या राशीत एकूण १४ गुण देतो तर ह्या कुंडलीप्रमाणे त्या व्यक्तीला दक्षिण दिशा हि सर्वात फलदायी ठरेल.
नोट — वरील सूर्याच्या कुंडलीत हा उपयोग फक्त करिअर ने भाग्योदय होण्यासाठी कोणती दिशा वापरावी ह्याचा विचार होऊ शकेल.
धन्यवाद…..!