मार्केंडेय ऋषींनी जेव्हा ७०० श्लोक रचून दुर्गा सप्तशती लिहिली तेव्हा त्याचा काही ठिकाणी दुरुपयोग होऊ लागला आणि त्यामुळे ह्या सर्व श्लोकांना ब्रम्हा / वशिष्ठ / और विश्वामित्र ने श्रापित केले ज्याने वाईट माणसांकडून ह्याचा दुरुपयोग होणार नाही. पण नारदाच्या आग्रहाखातर सामान्य जनमानसाला ह्याचा उपयोग होण्यासाठी पुन्हा ह्याचा उपयोग करण्यासाठी त्यांनीच ह्याला शापोद्धार आणि उत्कीलनं करून दिले.
उत्कीलनं — ह्याचा अर्थ मंत्र खोलण्यासाठी होतो.
वराही तंत्रानुसार सर्वच स्तोत्रांना परशुरामाचा शाप आहे, तेथेच पुढे असेही म्हटले आहे कि
‘ भीष्मपर्वानि या गीता स प्रशस्ता कलौ युगे।
विष्णोर्नामसहस्त्राखयं महाभारतमध्यग।
गजेंद्रमोक्षणां चैव ताठ कारुण्यक्स्त:।
देव्या: सप्तशतीस्तोत्र शैवं नामसहस्रक।।
अर्थात महाभारतातील भीष्मवर्गांतर्गत गीता तसेच विष्णुसहस्त्रनाम , गजेंद्रमोक्ष, देवीसप्तशती, आणि शिवसहस्रनाम हि स्रोते कलियुगात प्रशस्त असून हि स्तोत्रे परशुरामाच्या शापापासून मुक्त आहेत.
उपरोक्त वाचनाच्या आधारे सप्तशतीस परशुरामाचा शाप नाही असे दिसून येते. त्यामुळे वाराहीतंत्राच्या मते सप्तशतीपाठाच्या वेळी स्वतंत्रपणे शापोद्धार करण्याची आवश्यकता नाही.
रहस्यातंत्र — ह्या ग्रंथात ‘शिवकृकिलदर्शन’ प्रकरणात दानप्रतिग्रहाचे विशेष महत्व सांगून सप्तशतीच्या बाबतीत उत्कीलनाची काहीच जरुरी नाही असे स्पष्टपणे प्रतिपादन केले आहे.
काही जणांच्या मते अर्गलास्तोत्रने शापोद्धार व किलकस्त्रोत्राने उत्कीलन होत असल्यामुळे स्वतंत्र शापोद्धार- उत्कीनांची आवश्यकता नाही.
काही जणांच्या मते षडंगसहित सप्तशतीचा पाठ ह्यातच शापोद्धार व उत्कीलं सामावलेले आहे.
कात्यायनीतंत्रानुसार सप्तशतीतील १३-१ , १२-२, ११-३, १०-४, ९-५, ८-६, ७-७ अशा क्रमाने अध्याय पठण केल्यास शापोद्धार होतो आणि मध्यम-प्रथम-उत्तम ह्या क्रमाने सप्तशती ची चरिते पठण केल्याने उत्कीलंन होते.
काही जण शापोद्धारसाठी ——‘ ॐ ह्रीं क्लीं श्रीं क्रां क्रीं चण्डिके देवी शापनाशानुग्रहं कुरु स्वःहा।। ह्या मंत्राचा ७ वेळा जप करतात.
अणि उत्कीलनासाठी ——‘ॐ श्रीं क्लीं ह्रीं सप्तशति चण्डिके उत्कीलनं कुरु कुरु स्वाहा।। ह्या मंत्राचा २१ वेळा आधी अणि नंतर २१ वेळा पुनः करतात.
रुद्रयामलतंत्रात पुढील प्रमाणे विशेष शापोद्धारसाठी विधी दिला आहे. ह्यास पाठ सुरु होण्यापूर्वीच म्हणावा नंतर म्हणू नये.
ॐ अस्य श्रीचण्डिकाया ब्रह्मवसिष्ठविश्वामित्रशापविमोचनमन्त्रस्य वसिष्ठ-नारदसंवादसामवेदाधिपतिब्रह्माण ऋषयः सर्वैश्वर्यकारिणी श्रीदुर्गा देवता चरित्रत्रयं बीजं ह्री शक्तिः त्रिगुणात्मस्वरूपचण्डिकाशापविमुक्तौ मम संकल्पितकार्यसिद्ध्यर्थे जपे विनियोगः।
ॐ (ह्रीं) रीं रेतःस्वरूपिण्यै मधुकैटभमर्दिन्यै
ब्रह्मवसिष्ठविश्वामित्रशापाद् विमुक्ता भव॥1॥
ॐ श्रीं बुद्धिस्वरूपिण्यै महिषासुरसैन्यनाशिन्यै
ब्रह्मवसिष्ठ विश्वामित्रशापाद् विमुक्ता भव॥2॥
ॐ रं रक्तस्वरूपिण्यै महिषासुरमर्दिन्यै
ब्रह्मवसिष्ठविश्वामित्रशापाद् विमुक्ता भव॥3॥
ॐ क्षुं क्षुधास्वरूपिण्यै देववन्दितायै
ब्रह्मवसिष्ठविश्वामित्रशापाद् विमुक्ता भव॥4॥
ॐ छां छायास्वरूपिण्यै दूतसंवादिन्यै
ब्रह्मवसिष्ठविश्वामित्रशापाद् विमुक्ता भव॥5॥
ॐ शं शक्तिस्वरूपिण्यै धूम्रलोचनघातिन्यै
ब्रह्मवसिष्ठविश्वामित्रशापाद् विमुक्ता भव॥6॥
ॐ तृं तृषास्वरूपिण्यै चण्डमुण्डवधकारिण्यै
ब्रह्मवसिष्ठविश्वामित्र शापाद् विमुक्ता भव॥7॥
ॐ क्षां क्षान्तिस्वरूपिण्यै रक्तबीजवधकारिण्यै
ब्रह्मवसिष्ठविश्वामित्रशापाद् विमुक्ता भव॥8॥
ॐ जां जातिस्वरूपिण्यै निशुम्भवधकारिण्यै
ब्रह्मवसिष्ठविश्वामित्रशापाद् विमुक्ता भव॥9॥
ॐ लं लज्जास्वरूपिण्यै शुम्भवधकारिण्यै
ब्रह्मवसिष्ठविश्वामित्रशापाद् विमुक्ता भव॥10॥
ॐ शां शान्तिस्वरूपिण्यै देवस्तुत्यै
ब्रह्मवसिष्ठविश्वामित्रशापाद् विमुक्ता भव॥11॥
ॐ श्रं श्रद्धास्वरूपिण्यै सकलफलदात्र्यै
ब्रह्मवसिष्ठविश्वामित्रशापाद् विमुक्ता भव॥12॥
ॐ कां कान्तिस्वरूपिण्यै राजवरप्रदायै
ब्रह्मवसिष्ठविश्वामित्रशापाद् विमुक्ता भव॥13॥
ॐ मां मातृस्वरूपिण्यै अनर्गलमहिमसहितायै
ब्रह्मवसिष्ठविश्वामित्रशापाद् विमुक्ता भव॥14॥
ॐ ह्रीं श्रीं दुं दुर्गायै सं सर्वैश्वर्यकारिण्यै
ब्रह्मवसिष्ठविश्वामित्रशापाद् विमुक्ता भव॥15॥
ॐ ऐं ह्रीं क्लीं नमः शिवायै अभेद्यकवचस्वरूपिण्यै
ब्रह्मवसिष्ठविश्वामित्रशापाद् विमुक्ता भव॥16॥
ॐ क्रीं काल्यै कालि ह्रीं फट् स्वाहायै ऋग्वेदस्वरूपिण्यै
ब्रह्मवसिष्ठविश्वामित्रशापाद् विमुक्ता भव॥17॥
ॐ ऐं ह्री क्लीं महाकालीमहालक्ष्मी-महासरस्वतीस्वरूपिण्यै त्रिगुणात्मिकायै दुर्गादेव्यै नमः॥18॥
इत्येवं हि महामन्त्रान् पठित्वा परमेश्वर।
चण्डीपाठं दिवा रात्रौ कुर्यादेव न संशयः॥19॥
एवं मन्त्रं न जानाति चण्डीपाठं करोति यः।
आत्मानं चैव दातारं क्षीणं कुर्यान्न संशयः॥20॥
नोट — वरील सर्व शापोद्धार आणि उत्कीलनं ची माहिती दिल्यानंतर जास्त कॉंफुंज्ड होऊ नये. सप्तशती पाठ करताना आपल्याला जे जमेल ते करावे शापोद्वार आणि उत्कीलन साठी.
शापोद्वार हा पाठच्या सुरुवातीला म्हणावा आणि उत्कीलन हा सुरुवात करताना आणि प्रत्येक पाठ झाल्यावर म्हणावा.
अधिक माहिती माझ्यामते काय करावे हे सप्तशती पाठ विधी ह्या पुढील लेखात मिळेल.
धन्यवाद…..!
Good information 👍 best