Table of Contents
गोवर्धन पूजन महत्व
कृष्णाचे बालपण हे नंदबाबा आणि यशोदेकडे गेले. कार्तिक शुक्ल प्रतिपदेपासून प्रत्येक वर्षी नंदबाबा सर्व गावकर्यांना एकत्र करून इंद्राची पूजा करायचा कारण त्यांची इंद्रावर फार श्रद्धा होती त्याची पूजाअर्चा केल्याने पाऊस उत्तम पडतो धान्य चांगले येते असे ते मानत.
पण हे कृष्णाला काही पटत नव्हते. त्याने नंदबाबाची आणि गावकऱ्यांची समजूत काढली कि गोवर्धन पर्वतामुळेच आपल्याला हे सर्व मिळत आहे. त्यात तो सफल झाला आणि तेव्हापासून गोवर्धन पर्वताच्या पूजेचा प्रारंभ झाला.
पण त्याच वेळी इंद्राचा कोप होऊन तेथे खूप पाऊस पडला आणि सर्व जलमय झाले. गावकरी संकटात पाहून कृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून धरला आणि सर्व गावकऱ्यांचे त्याखाली रक्षण केले.
पुढे हा प्रकार कार्तिक शुक्ल अष्टमी ७ दिवस पर्यन्त सुरु होता. शेवटी इंद्र कृष्णाला शरण आला. त्याने त्याचा प्रकोप थांबविला तो दिवस कार्तिक शुक्ल अष्टमी गोपाष्टमी म्हणून मानविण्याची पद्धती आहे.
गोवर्धन पूजा
गोवर्धन पर्वताचे आणि कृष्णाचे आभार म्हणून ह्या दिवशी गायीचे शेण आणि माती आणून गोवर्धन पर्वत बनवून त्याची प्रदक्षिणा करून पूजा करण्याची पद्धती आहे. ह्याच दिवशी कृष्णाला मंदिरात ५६ भोग सुद्धा अर्पित करतात.
गोवर्धन पूजा मंत्र
गोवर्धन धराधार गोकुल त्राणकारक।
विष्णुबाहु कृतोच्छ्राय गवां कोटिप्रभो भव।।
ह्या दिवशी कढीभात,पत्तेदार भाजी, बेसन चे पदार्थ शक्य नसल्यास घरातील कृष्णाची मनोभावे लोण्याचा खडीसाखरेचा नैवैद्य दाखवून पूजा अर्चा केल्याने आपत्ती संकटांपासून कृष्ण आपली रक्षा करतो असा भाव आहे. ह्या दिवशी गायीला सुद्धा नेवैद्य काढावा.
धन्यवाद…..!
श्री दत्तगुरु ज्योतिष
shreedattagurujyotish.com
9821817768
7506737519