हिंदू धर्मात भाऊबीज चे फार महत्व आहे. ह्या पर्वाला यमद्वितीया / भ्रातृ द्वितीय सुद्धा म्हणतात. ह्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीच्या घरी बहिणीकडून कपाळी विजय तिलक + ओवाळणी करून घेतो बहीण भावाला गोडधोड जेवायला घालते.
बहीण आपल्या भावाची ओवाळणी करून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते तो पराक्रमी होऊन त्याच्या करिअर मध्ये खूप प्रगती व्हावी म्हणून सुद्धा हि प्रार्थना बहिणीकडून केली जाते नंतर भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देतात.
का मानवली जाते भाऊबीज यमद्वितीयेला ??
पुराणाच्या संदर्भानुसार सूर्याच्या पत्नीचे नाव छाया होते तिला यमुना आणि यमराज अशी दोन मुलं.
यमुना हि आपल्या यम भावाला खूप प्रेम करत होती. प्रत्येक वेळी त्याला आपल्या घरी जेवणाचे आमंत्रण ती देत असे पण अतिव्यस्ततेमुळे यम नेहमी हे टाळत असे शेवटी कार्तिक शुक्ल द्वितीयेला यमुनाने यमाकडून तसे वचनच घेतले. आणि त्याला जेवणाचे आमंत्रण दिले.
यमराज नेहमी विचार करत असे कि मी मृत्यूची देवता असून मला कोण आपल्या घरी जेवायला बोलावेल आणि जर माझी बहीण मला बोलावते आहे तिच्या घरी तर मला माझ्या धर्माचे पालन म्हणून तिच्या घरी ह्या वेळी जायलाच पाहिजे. असे म्हणून यमराज द्वितीयेला तिच्या घरी गेला. बहिणीच्या घरी निघताना त्याने नरकातून कित्येक जीव मुक्त केले अशी सुद्धा आख्यायिका आहे.
बहिणीने त्यास अंघोळीला पाणी दिले त्याला समोर बसवून तिलक केला आणि जेवायला सुद्धा घातले. यमराज ह्यावर प्रसन्न होऊन बहिणीला वर मागायला सांगितला . बहिणीने लगेच आपल्या भावाकडून असा वर मागून घेतला कि तू प्रत्येक वर्षी ह्या दिवशी माझ्या घरी येत जा.
जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी ह्या दिवशी ओवाळणी +जेवायला जाईल त्याला तुझ्यातर्फे मृत्यूचे आणि नरकाचे भय नसावे. हे ऐकून यमाने सुद्धा असेच मी करेन ह्याचे वाचन दिले आणि तेव्हापासून भाऊबीज सण साजरा करण्याची आणि यमुना नदीच्या पूजनाचे ह्या दिवशी महत्व आहे.
धन्यवाद…..!
श्री दत्तगुरु ज्योतिष
shreedattagurujyotish.com
9821817768
7506737519