You are currently viewing अश्विन शुद्ध नवरात्री उत्सव २०२० : भाग ३

नवरात्रीचे पाठ आणि इतर मंत्र / स्तोत्र वाचन

जर आपण घट बसावीत असाल किंवा उपवास करीत असाल तर त्याच्या स्थापनेची विधी खालील लिंक वर दिली आहे त्यावर क्लिक करून वाचून घ्यावी.

अश्विन शुद्ध नवरात्री उत्सव २०२० : घटस्थापना

नवरात्री उत्सव २०२० : उपवास नवरात्रीचा

पूर्ण नवरात्रीच्या पर्वात सर्वात सुंदर आणि देवीला आळविणारे जर कोणते वाचन असेल तर ते दुर्गा सप्तशती पाठ आहे. पूर्ण श्रद्धेनं आणि नियमांनी केलेले हे पाठ आपल्या नवरात्रीच्या ह्या पर्वात आपल्याला काहीतरी शक्ती देऊनच जातील ह्यावर पूर्ण विश्वास ठेवा.

काही जणांना हे जर पॉसिबल नसेल तर रोज श्री सूक्त आणि त्याबरोबर देवी कवच वाचू शकता.

हे हि जमत नसेल तर देवीच्या आराधनेसाठी घरात बसून एक माळ किंवा रोज ११/२१/५१ माळा नवार्ण मंत्राचा जप केल्याने सुद्धा आई भगवती ची साधना पूर्ण झाल्याचे फळ मिळेल. आणि तिचा आशीर्वाद मिळाल्यावाचुन राहणार नाही.

नवरात्रीत आईच्या प्रत्येक स्वरूपाचे मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता ह्या पर्वात.

  • शैलपुत्री : पहिल्या दिवशी
    • मंत्र- ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं शैलपुत्र्यै नम:।’
  • ब्रह्मचारिणी : दुसऱ्या दिवशी
    • मंत्र- ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं ब्रह्मचारिण्यै नम:।’
  • चन्द्रघंटा : तिसऱ्या दिवशी
    • मंत्र- ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चन्द्रघंटायै नम:।’
  • कूष्मांडा : चौथ्या दिवशी
    • मंत्र- ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं कूष्मांडायै नम:।’
  • स्कंदमाता : पाचव्या दिवशी
    • मंत्र- ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं स्कंदमातायै नम:।’
  • कात्यायनी : सहाव्या दिवशी
    • मंत्र- ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं कात्यायनायै नम:।’
  • कालरात्रि : सातव्या दिवशी
    • मंत्र- ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं कालरात्र्यै नम:।’
  • महागौरी : आठव्या दिवशी
    • मंत्र- ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं महागौर्ये नम:।’
  • सिद्धिदात्री : नवव्या दिवशी
    • मंत्र- ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं सिद्धिदात्यै नम:।’

वरील मंत्राची एक एक माळ प्रत्येक दिवसाप्रमाणे करून घ्यावी म्हणजे आईच्या ९ स्वरूपाची आराधना केल्याचे फळ मिळते.

हे हि नाही जमले तर ओम दूं दुर्गाय नमः ची एक माळा रोज जपावी

केव्हा करावा मंत्र जप

सकाळी स्नान कर्म झाल्यावर पूर्व दिशेला बसून वरील कोणतीही साधना करू शकता. शक्यतो वेळ हि ७ ते ८ पर्यंत असावी.

सायंकाळी तिन्ही सांजेच्या वेळी आरती आधी किंवा आरती झाल्यावर सुद्धा वरील कोणतीही साधना वाचन मंत्र जप करू शकता.

नवरात्रीचे महत्व हे नऊ रात्रीचे आहे आणि त्यासाठी जर शक्य असेल तर वरील कोणतीही साधना हि रात्री ११ वाजता सुद्धा करू शकता.

कसे करावे

आधी कोणती साधना जमेल त्याची निवड करावी. पूर्ण शद्ध होऊन ह्या साधना कराव्यात. ह्यात पूर्व किंवा उत्तरेला मुख असावे. बसायला आसन असावे लाल असेल तर उत्तम. लाल वस्त्र परिधान करून हि साधना उत्तम असेल जमले नाही तर एखादे लाल वस्त्र जवळ घेऊन बसावे.

माळेसाठी रुद्राक्ष माळ किंवा स्फटिकाच्या माळेचा उपयोग करू शकता. नवीन आणली असेल तर तिच्या पहिल्या प्रयोग आधी तिला स्वच्छ करून पाटावर ठेऊन पूजन करावे हळद कुंकू घालून पुढील जप मी ह्यावर जर केले तर ते सिद्ध होऊ दे ह्याची याचना करावी त्या माळेपुढे.

हा एक सामान्य विधी आहे माळा शुद्धीकरणाचा तसा हा एक शास्त्रोक्त विधी आहे पण इथे देणे अशक्य आहे. जर काही ह्याबद्दल शंका असेल तर सरळ बोटांवर मोजून जप करावा. ह्यातही काही अडचणी असेल तर सरळ तो जप १०८ वेळा म्हणण्यात किती मिनिटे लागतात तेव्हढे मिनिटे सर्व करून म्हणावा. जास्त केला तरी चालतो. रोज तेव्हढे मिनिटे ध्यान लावून जप करून उठावे हे उत्तम.

सुरुवात करण्या अगोदर आचमन करावे उजव्या हातात तीन वेळा पाणी घेऊन ॐ केशवाय नमः ॐ माधवाय नमः ॐ नारायणाय नमः असे म्हणून तीनदा प्यावे आणि चौथ्या वेळी पुन्हा एकदा पाणी घेऊन ॐ गोविंदाय नमः असे पाणी एका प्लेट मध्ये खाली सोडावे. हा शुद्धीकरणाचा बेसिक प्रोसेस आहे.

फक्त पहिल्या दिवशी कोणतीही साधना करताना जर कोणत्या कार्यसिद्धी साठी हे करीत आहेत तर त्याचा संकल्प करून घ्यावा. हे घटस्थापना च्या पोस्ट मध्ये संकल्प विधी दिला आहे. वाचून घ्यावे.

नंतर आपण जी साधना निवडली आहे त्याची सुरुवात करावी.

पुढील लेखात दुर्गा सप्तशती च्या पाठाचा वाचन विधी देणार आहे.

धन्यवाद…..!

This Post Has One Comment

  1. YOGITA VANKAR

    Nice information.

Leave a Reply