You are currently viewing भौम प्रदोष- २९ सप्टेंबर २०२०

प्रदोष व्रत ची पोस्ट आधी खालील लिंक वर अधिक माहितीसाठी वाचून घ्यावी.

प्रदोष व्रत विशेष

https://shreedattagurujyotish.com/pradosh-vrat-vishesh/

आज भौम प्रदोष आहे.
भौम प्रदोष काल : सायंकाळी १८:२८ ते २०:५२ पर्यंत.
ह्या वेळी शिव पूजन करावे. शिवाला पंचामृत ने अभिषेक करून 1/3/5/7 ह्या संख्येने बेल अर्पित करावे.

ज्यांना पत्रिकेतील मंगळ दोष आहे. जे मांगलिक आहेत आणि त्यामुळे विवाहात अडचणी आहेत. ज्यांच्या कडे कर्ज हा विषय खूप त्रासदायक झाला आहे. ज्यांना काही रिलेशन मेंटेन करता येत नसेल. अशा सर्वानी ह्या दिवशी खालील प्रयोग प्रदोष काळी करावा.

शिव मंदिरात जावे प्रदोष काळी शिव पिंडीवर पंचामृताने अभिषेक करून तिन्ही बेलाच्या पानावर ॐ भौमाय नमः हा मंत्र चंदन पावडर + गंगाजल मिक्स करून कोणत्याही साधनाने लिहून तो बेल ज्या सरळ बाजूला लिहिला आहे तो शिव पिंडी वर स्पर्श होईल असा ठेवावा. असे ३/५/७ बेल घरातून तयार करून घेऊन जाऊ शकता. आणि बेल वाहिल्यानंतर ॐ भौम भौमाय नमः चा जप तिथे बसून करावा जमेल तेव्हढा.

वर दिलेल्या समस्येतून हळू हळू मार्ग निघण्यास मदत होईल. असे ११ भौमप्रदोष तरी करत राहावेत.

धन्यवाद…..!

Leave a Reply