तिथीनुसार श्राद्ध
- प्रतिपदा श्राद्ध
- द्वितीया श्राद्ध
- तृतीया श्राद्ध
- चतुर्थी श्राद्ध
- महा भरणी, पञ्चमी श्राद्ध
- षष्ठी श्राद्ध
- सप्तमी श्राद्ध
- अष्टमी श्राद्ध
- नवमी श्राद्ध
- दशमी श्राद्ध
- एकादशी श्राद्ध
- द्वादशी श्राद्ध
- त्रयोदशी श्राद्ध
- चतुर्दशी श्राद्ध
- पित्रू अमावस्या
जे पितर ज्या तिथीला गेले आहेत त्या त्या तिथीप्रमाणे त्यांचे श्राद्ध हे तिथीप्रमाणे करावे त्यात तर्पण पिंडदान आणि श्राद्ध कर्म दान वगैरे सर्व करावे विधीप्रमाणे.
जर एखाद वेळी तिथी माहित नसेल तर खालील प्रमाणे समजावे :-
१) पित्यासाठी अष्टमीला श्राद्ध केले जाते.
२) आई साठी नवमी ला श्राद्ध केले जाते.
३) अपघाताने गेलेल्या सर्वांचे श्राद्ध हे चतुर्दशी तिथीला करण्याची पद्धती आहे.
४) साधू संन्यासी यांची श्राद्धे द्वादशीला करतात.
५) अशा बहुतेक मागील पितरांची तिथी वगैरे आठवत नसेल आणि काही कारणास्तव पंधरवड्यात कोणाचेहि श्राद्ध कर्म करता आले नसेल तेव्हा अशा परिस्थितीत सर्व पितृ अमावस्या दिवशी आपल्या घराण्यातील सर्व पितरांचे श्राद्ध करण्याची पद्धती आता ह्या घडीला सुलभ समजली जाते.
काही घराण्यात सर्व पितरांची तिथी हि मुख्य व्यक्तींच्या तिथीला जुळवून घेण्याची सुद्धा पद्धती आहे जेणे करून एकदाच एकाच तिथीला त्यांचे श्राद्ध कर्म करता यावे.
कोणत्याही पद्धतीने श्राद्ध केले तरी चालते फक्त ते श्रद्धेने असावे ते श्राद्ध पितरांपर्यन्त पोहोचते.
धन्यवाद….!