Table of Contents
भिन्नाष्टक चे नियम
भिन्नाष्टक चे नियम- भिन्नाष्टक सारिणी जर हाताने बनवायची असेल तर खालील तक्त्याचा उपयोग हा करता येतो.
कॉम्पुटर कुंडलीत ती अशी दिसते.
जेव्हा सूर्याचे भिन्नाष्टक बनवायचे असते तेव्हा प्रथम सूर्य कुंडलीत कुठे आहे हे पाहावे तो ज्या स्थानात बसला असेल तेथील राशीचा एकदा लिहून घ्यावा. वरील कुंडलीत सूर्य हा ८ वृश्चिक राशीत आहे. म्हणून टेबल मध्ये सूर्याच्या समोर एकदम वरच्या लाईन मध्ये ८ ९ १० ११ १२ १ २ ३ ४ ५ ६ ७ लिहिले आहे ते राशीचे आकडे आहेत. बाजूला लग्न कुंडली दिली आहे.
सूर्य जेव्हा वरील राशीतून जात असतो तेव्हा तो स्वतःपासून आणि इतर ग्रहांपासून एक एक बिंदू देत असतो. ह्याचा अर्थ सूर्यापासून सूर्य जेव्हा १,२,७,८,९,१०,११ व्या स्थानात जातो तेव्हा तो त्या स्थानाचे चांगले फळ देत असतो. नंतर तो चंद्रापासून ३,६,१०,११ व्या स्थानी जातो तेव्हा तेथे एक एक बिंदू देतो. असे प्रत्येक ग्रहांपासून बिंदू देत असतो.
असे त्याचे एकूण ४८ बिंदू होतात. रवी च्या कुंडलीत जिथे गोल गोल आणि त्यात जे नंबर लिहिले आहेत ह्याचा अर्थ रवी ने त्या स्थानाला २ बिंदू दिले आहेत ते पहिले लग्न स्थान आहे. दुसऱ्या स्थानात ५ बिंदू दिले आहेत ते धन स्थान आहे.
असेच तो प्रत्येक स्थानात बिंदू देत जातो जेव्हा तो खालील टेबल प्रमाणे त्या त्या ग्रहांपासून जात असतो.
रवी एक राशीत ३० दिवस असतो आणि जर तो वरील कुंडलीत जेव्हा एखाद्या स्थानात ४ पेक्षा जास्त बिंदू देतो तेव्हा तो तेथे चांगली फळे देण्यास समर्थ असतो.
टेबल मध्ये पहा २ च्या खाली ७ अंक लिहिले आहेत.
जेव्हा रवी २ वृषभ राशीत असेल कोणत्याही वर्षी १५ मे ते १५ जून पर्यंत वृषभेत असेल तेव्हा ह्या व्यक्तीला रावीपासून चांगले फळे त्या स्थानात मिळतील.
हेही वाचा :- भिन्नाष्टक वर्गात वैवाहिक सुखाचा दर्जा
सूर्य भिन्नाष्टक
- सूर्यापासून सूर्य १,२,४,७,८,९,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- चंद्र पासून सूर्य -३,६,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- मंगळ पासून सूर्य – १,२,४,७,८,९,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- बुध पासून सूर्य – ३,५,६,९,१०,११,१२ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- गुरु पासून सूर्य – ५,६,९,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- शुक्र पासून सूर्य – ६,७,१२ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- शनी पासून सूर्य – १,२,४,७,८,९,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- लग्न पासून सूर्य – ३,४,६,१०,११,१२ व्या घरात एक एक बिंदू देतो.
चंद्र भिन्नाष्टक
- चंद्र पासून चंद्र १,३,६,७,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- रवी पासून चंद्र – ३,६,७,८,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- मंगळ पासून चंद्र -२,३,५,६,९,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- बुध पासून चंद्र — १,३,४,५,७,८,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- गुरु पासून चंद्र — १,४,७,८,१०,११,१२ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- गुरु पासून सूर्य — ३,४,५,७,९,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- शनी पासून चंद्र – ३,५,६,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- लग्न पासून चंद्र – ३,६,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
मंगळ भिन्नाष्टक
- मंगळ पासून मंगळ–१,२,४,७,८,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- सूर्य पासून मंगळ–३,५,६,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- चंद्र पासून मंगळ–३,६,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- बुध पासून मंगळ–३,५,६,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- गुरु पासून मंगळ–६,१०,११,१२ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- शुक्र पासून मंगळ–६,८,११,१२ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- शनी पासून मंगळ१,४,७,८,९,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- लग्न पासून मंगळ -१,३,६,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
बुध भिन्नाष्टक
- बुध पासून बुध–१,३,५,६,९,१०,११,१२ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- सूर्य पासून बुध–५,६,९,११,१२ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- चंद्र पासून बुध–२,४,६,८,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- मंगळ पासून बुध–१,२,४,७,८,९,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- गुरु पासून बुध–६,८,११,१२ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- शुक्र पासून बुध–१,२,३,४,५,८,९,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- शनी पासून बुध–१,२,४,७,८,९,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- लग्न पासून बुध-१,२,४,६,८,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
गुरु भिन्नाष्टक
- गुरु पासून गुरु –१,२,३,४,७,८,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- रवी पासून गुरु–१,२,३,४,७,८,९,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- चंद्र पासून गुरु–२,५,७,९,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- मंगळ पासून गुरु–१,२,४,७,८,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- बुध पासून गुरु –१,२,४,५,६,९,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- शुक्र पासून गुरु –२,५,६,९,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- शनी पासून गुरु –३,५,६,१२ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- लग्न पासून गुरु –१,२,४,५,६,७,९,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
शुक्र भिन्नाष्टक
- शुक्र पासून शुक्र–१,२,३,४,५,८,९,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- रवी पासून शुक्र–८,११,१२ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- चंद्र पासून शुक्र–१,२,३,४,५,८,९,११,१२ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- मंगळ पासून शुक्र–३,५,६,९,११,१२ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- बुध पासून शुक्र –३,५,६,९,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- गुरु पासून शुक्र–५,८,९,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- शनी पासून शुक्र–३,४,५,८,९,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- लग्न पासून शुक्र-१,२,३,४,५,८,९,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
शनी भिन्नाष्टक
- शनी पासून शनी — ३,५,६,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- सूर्य पासून शनी –१,२,४,७,८,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- चंद्र पासून शनी –३,६,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- मंगळ पासून शनी –३,५,६,१०,११,१२ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- बुध पासून शनी –६,८,९,१०,११,१२ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- गुरु पासून शनी –५,६,११,१२ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- शुक्र पासून शनी –६,११,१२ व्या घरात एक एक बिंदू देतो.
- लग्न पासून शनी –१,३,४,६,१०,११ व्या घरात एक एक बिंदू देतो.
असे प्रत्येक ग्रहाचे टेबल हाताने तुम्ही बनवू शकता.
नोट — वरील प्रकार हा ज्योतिषांची जरी असला त्यांना जर हाताने बिंदू शोधन करायचे असेल तरी तुम्ही तुमच्या कॉम्पुटर च्या पत्रिकेत हे टेबल पाहू शकता. कोणत्याही सॉफ्टवेअर मध्ये हे टेबल असते.
धन्यवाद…..!