भोगी
संक्रांतीच्या अगोदर एक दिवस भोगी मानवली जाते.
ह्या दिवशी हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, फ्लॉवर ह्या भाज्या भरपूर प्रमाणात येतात आणि त्या सर्व भाज्या एकत्र करून भोगी ची भाजी तयार केली जाते. त्याबरोबर तीळ घालून भाकरी बनवून त्या भाजीबरोबर जे जिन्नस खाण्याचा प्रकार शरीरात उत्तम ऊर्जा निर्माण करणारा हा प्रयोग आहे.
या दिवशी इंद्र देवाची आठवण काढली जाते. इंद्र देवाने आपल्या धर्तीवर उदंड पिकं पिकावी म्हणून प्रार्थना केली होती, अशी मान्यता आहे. ती पिकं वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते.
हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहर आलेला असतो. त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडासा विसावा लाभतो.मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रीत बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेऊन ऊबदाररूपी प्रेमाचा तो अनुभव घेतो, त्यामुळे पुन्हा वर्षभर शेतात काम करण्यास ते सज्ज होतात. मराठवाड्यात या भाजीला ‘खेंगट’ म्हणतात. संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो आणि या सणापासूनच नंतर महाराष्ट्रात सगळ्या सणांना सुरूवात होते.
या दिवशी सवाष्णीला जेवायला बोलवतात. तिचे आदरातिथ्य केले जाते देवाची व सूर्याची पूजा करुन वरील पदार्थांचा नैवेद्य दाखवून सवाष्णसह सर्वजण एकत्र जेवायला बसतात. जेवणानंतर सवाष्णीला दान- दक्षिणा देण्याची ही पध्दत आहे.
सकाळी ह्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ घालून स्नान करण्याची परंपरा सुद्धा आहे.
धन्यवाद…..!
nice information