करण काय आहे , किती आणि कसे आहेत
२ पक्ष एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष दोन्ही १५/१५ दिवसांचे असतात
प्रत्येक पक्षात १५ तिथी असतात प्रतिपदेपासून पौर्णिमा शुक्ल पक्ष आणि पौर्णिमा नंतर अमावस्या पर्यंत कृष्ण पक्ष
ती प्रत्येक तिथी २४ तासांची असेल म्हणजे एक तिथी चा प्रभाव एका दिवसावर असेल
त्या तिथीचे २ भाग म्हणजे एक करण
एक तिथी म्हणजे चंद्र आणि सूर्य यांच्यातील १२ अंशाचा फरक.
एक करण = ६ अंशाचा फरक.
म्हणून एक तिथीमध्ये २ करणं असतात.
एकूण करण ११ असतात त्यातील ७ करणं हि चंचल करणं म्हणून ओळखली जातात हे दर महिन्याला अनेक वेळा पुन्हा पुन्हा येतात
बव, बालव, कौरव ,तैतिल , गर , वणिज, विष्टि (भद्र)
- स्थिर करण (एकदाच येतात)
हे फक्त कृष्ण पक्षातील शेवटच्या तिथींमध्ये येतात आणि एकदाच दर महिन्याला होतात.
शकुनि, चतुष्पद, नाग, किम्स्तुघ्न
🔹 करणाचे उपयोग काय?
शुभ-अशुभ कार्य ठरवताना करण खूप महत्वाचे असते.
विष्टि करण (भद्र) असताना शुभ कार्य टाळले जाते.
शकुनि, चतुष्पद, नाग, किम्स्तुघ्न हे करणही शुभ मानले जात नाहीत.
बव, बालव, कौलव, तैतिल, गर, वणिज ही करणं साधारणपणे शुभ मानली जातात.
करणांचा मानवी जीवनावर परिणाम कसा होतो?
- दैनंदिन कर्मात करणाचा प्रभाव
करण हे सूर्य व चंद्राच्या संयोगावर आधारित असल्याने मानसिकता, शरीराची चंचलता, स्थिरता, इच्छा व प्रवृत्तींवर त्याचा प्रभाव असतो.
शुभ करणात केलेली कामं अधिक यशस्वी होतात.
अशुभ करणात सुरु केलेल्या गोष्टींमध्ये अडथळे, अपयश, नुकसान किंवा उशीर होऊ शकतो.
हेही वाचा : कुंडलीत ह्या भावात केतू किंवा मंगळ असतील तर दोन सख्या भावंडानी एकत्र कधीच राहू नये
🔷 ११ करणांचे व्यक्ती जीवनावर होणारे संभाव्य परिणाम कसे ?
✅ 1. बव करण
स्वच्छ, कार्यक्षम, पवित्र करण.
व्यक्ती जीवनावर परिणाम: चांगली बुद्धिमत्ता, स्वच्छ वृत्ती, समाजहिताची भावना.
✅ 2. बालव करण
शौर्य, सृजनशीलता, प्रेरणा देते.
व्यक्ती जीवनावर परिणाम: बौद्धिक तेज, उत्तम कल्पकता, लहान वयात यश मिळवणं.
✅ 3. कौलव करण
शुभ व सौम्य करण.
व्यक्ती जीवनावर परिणाम: शांत स्वभाव, संयमित बोलणं, सौम्य वर्तन.
✅ 4. तैतिल करण
धाडसी निर्णय घेणारा काल.
व्यक्ती जीवनावर परिणाम: धैर्य, साहस, जोखीम घेण्याची तयारी.
✅ 5. गर करण
स्थैर्य, चिकाटीचे करण.
व्यक्ती जीवनावर परिणाम: मेहनती, आत्मनियंत्रण असलेले, कष्टातून यश मिळवणारे लोक.
✅ 6. वणिज करण
व्यवहार, सौदे, व्यापारास अनुकूल करण.
व्यक्ती जीवनावर परिणाम: व्यावसायिक कौशल्य, चतुरता, आर्थिक स्थैर्य.
⚠ 7. विष्टि (भद्र) करण
हे करण अशुभ मानले जाते.
मानवी परिणाम: उग्र स्वभाव्यक्ती जीवनावर परिणाम: अपयश किंवा वाद निर्माण होण्याची शक्यता.
❌ स्थिर व अशुभ करणांचे परिणाम (शकुनि, चतुष्पद, नाग, किम्स्तुघ्न):
ही करणं अमावस्येच्या अगोदर येतात आणि सामान्यतः शुभ कार्यांसाठी वर्ज्य मानली जातात.
करण मानवी परिणाम
शकुनि – चातुर्य, पण धोका घेणारी वृत्ती
चतुष्पद- प्राणीप्रेम, पण कधी कधी सडेतोड वर्तन
नाग- छुपे विचार, संशयी मन, शक्तिशाली बुद्धी
किम्स्तुघ्न- भ्रम, चुकांची शक्यता, चुकीची दिशा
📿 जीवनातील घटकांवर करणांचा प्रभाव
जीवन क्षेत्र करणाचा प्रभाव
शुभ कार्य (लग्न, नामकरण) फक्त शुभ करणातच योग्य
कर्ज, शस्त्रक्रिया, न्याय भद्र करण, तैतिल वगैरे चालते
व्यापार व नवीन कामाची सुरुवात वणिज, गर, बव करण अनुकूल
मानसिक स्वास्थ्य गर, कौलव, बालव करण मानसिक स्थैर्य देते
संघर्ष/वादग्रस्त काल विष्टि, शकुनि, नाग करण असताना संयम आवश्यक
करण म्हणजे “कर्माची दिशा” — एखाद्या क्षणी कार्य सुरू करण्याची योग्य वेळ दर्शवतो.
करणांचा निवड म्हणजे योग्य वेळेचा वापर, यशाचा दर वाढवणं.
जर चुकीच्या करणात कार्य केलं, तर मानसिक, आर्थिक किंवा सामाजिक अडचणी येऊ शकतात.
दैनंदिन पंचांगात करण पाहून निर्णय घेतल्यास जीवनातील यशाचा टक्का वाढतो.
धन्यवाद।
श्री दत्तगुरु ज्योतिष
9821817768
7506737519