ज्योतिष शास्त्रात राशीचे महत्त्व

मेष राशी

सर्वात पहिल्या क्रमांकाची पहिलीच राशी म्हणून मेष राशी ओळखली जाते. म्हणजे सर्वात आधी सर्वात पुढे असण्याची शक्ती युक्ती ह्या राशीला आपोआपच मिळते.

वृषभ राशी

कामाला सुरुवात करताना ह्यांना आळशीपणा येतो पण एकदा ह्यांनी स्वतःला जुंपले कि मागे पुढे पाहत नाहीत त्या कामात समाधान होईपर्यंत किंवा संपेपर्यंत तरी.

मिथुन राशी 

कुणाचा तरी सपोर्ट  घेण्याचा गुणधर्म आपोआप येतो. स्वतःचे निर्णय घेताना कभी इधर कभी उधर असे होते.

कर्क राशी 

हि राशी ४थ्या नंबर ची राशी आहे. पत्रिकेच्या ४थ्या स्थानावरून हि राशी मातृप्रधान राशी असते असे माझे मत आहे. आई जशी सर्वांची काळजी करते तशी हि राशी फार सर्व्हीसेबल असेल सर्वांसाठी.

सिंह राशी 

सिंह जंगलाचा राजा मानला आहे त्याचा राजेशाही थाट, त्याची डरकाळी , त्याचा चालण्याचा रुबाब त्याची ऐट हे सर्व ह्या राशीत पाहायला मिळते.

कन्या राशी 

ह्या राशीचे चिन्ह हे हातात फुल घेऊन उभी असलेली स्त्री आहे ह्याने ह्या राशीला नेहमी दुसऱ्याचा आदर करणारी राशी मनाली जाते. लगेच कुणाचा अपमान करणार नाहीत.

तुला राशी 

राशीचक्रातील हि ७ वि राशी आहे. ह्या राशीचा मालक हा शुक्र. तुळेच्या सौंदर्यात खूप ग्ल्यामर आहे आणि ती निसर्गतः लाभलेली असते. म्हणून तुम्ही तुळेच्या जेव्हढ्या स्त्रिया असतील त्यांना एक तरी खूप चांगले आकर्षण असते खास डोळ्यात हे जाणविते.

वृश्चिक राशी 

राशी चक्रातील ८ वि राशी, गुप्तांगाची राशी, कालपुरुषाच्या मृत्यू स्थानातील राशी, मंगळाची राशी, विंचू चिन्हाची राशी, जल तत्वाची राशी, स्थिर राशी, चंद्राची नीच राशी.

धनु राशी 

राशीचक्रातील ९ वि राशी (धनु राशी) , शरीरावरील मांड्यांची राशी, अर्धा माणूस अर्धा घोडा, हाती बाण असलेल्या चिन्हाची राशी , अग्नितत्त्वचि राशी, गुरु ची राशी.

मकर राशी 

मध्यम बांधा सुंदर मुखाकृती, खोलगट डोळे , सुंदर सुडौल शरीर असे मकर राशीच्या व्यक्तींचे बेसिक वर्णन करता येईल. राशी चक्रातील १० वि राशी मकर राशी.

कुंभ राशी 

सामान्य व्यक्तिमत्व पण चेहऱ्यावर बुद्धीचे तेज, स्लिम, मानेकडे उंटासारखे पुढे चेहरा करून चालणारे. ह्या राशीच्या व्यक्ती बऱ्याच वेळा उंच असतात.

आपल्या राशी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.